Home /News /national /

डोली उठण्याआधी निघाली वडिलांची अंत्ययात्रा, धाकट्या मुलीनं मुखाग्नी देत बजावलं कर्तव्य

डोली उठण्याआधी निघाली वडिलांची अंत्ययात्रा, धाकट्या मुलीनं मुखाग्नी देत बजावलं कर्तव्य

लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती आणि अशा स्थितीत वडिलांना रुग्णालयात घेऊन जावं लागलं.

    सीधी, 30 ऑक्टोबर : वडिलांच्या अचानक जाण्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला. लहान मुलीनं वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन मुलाची कर्तव्य निभावल्याची घटना मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे मुला-मुलींमधील असणारा भेदभाव कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. सिधीच्या ललिता चौकात राहणारे देवी दीन सोनी यांचे निधन झाले. अशा परिस्थितीत त्यांची लहान मुलगी चांदणी सोनी यांनी वडिलांना अग्नी देऊन अंतिम संस्कार केले. मुलगी होण्याबरोबरच तिने मुलाचे कर्तव्यही पार पाडले आणि समाजासाठी एक आदर्श ठेवला. आता या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. लोक चांदणीनं निभावलेल्या या कर्तव्याचं कौतुक करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लालता चौक स्थित जुन्या स्टॅन्डजवळ देवी दीन सोनी दीर्घ आजारानं ग्रासलेले होते. त्यांना उपचारासाठी बनारस इथे दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचं कारण देत रुग्णालयानं देवी दीन सोनी यांना रुग्णालयातून घरी पाठवून दिलं. रुग्णालयातून घरी जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देवी दीन कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनी कुटुंबात दोनच मुली आहेत. मोठ्या मुलीचे नाव रोशनी आणि सर्वात मोठी मुलगी चांदणी आहे. देवी दीन तिच्या दोन्ही मुलींना मुलगा मानत असे. खास गोष्ट म्हणजे घरात देवी दीनच्या मोठ्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्याच वेळी हा आजार वाढल्यानं त्यांना रुग्णालयात तातडीनं दाखल करावं लागलं. हे वाचा-रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याचा प्रताप,बनावट आदेश दाखवून ठेकेदाराला 3 कोटींना लुटले लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती आणि अशा स्थितीत वडिलांना रुग्णालयात घेऊन जावं लागलं. रुग्णालयानंही जास्त काळ उपचार करण्यासाठी कोरोनामुळे नकार देत घरी पाठवून दिलं. त्याच दरम्यान घरी येत असताना वडिलांचा मृत्यू झाल्यानं मुलींसमोर दु:खाचा डोंगर उभा राहिला. मात्र हिम्मत सोडली नाही. वडिलांनी मुलांसमान वागणूक दिली आणि ती वेळ आल्यावर निभावता यायला हवी हा निश्चय करून धाकट्या बहिणीनं वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या