मराठी बातम्या /बातम्या /देश /

RTO अधिकारी निघाला कुबेर, पगारापेक्षा 650 पट जास्त मालमत्ता, 6 अलिशान घरं

RTO अधिकारी निघाला कुबेर, पगारापेक्षा 650 पट जास्त मालमत्ता, 6 अलिशान घरं

या अधिकाऱ्याच्या घरी कोट्यवधी रुपये आणि पगारापेक्षा कमाई जास्त अशी तऱ्हा झाली. या अधिकाऱ्याच्या घरी पगारापेक्षा 650 पट अधिक मालमत्ता सापडली आहे.

    जबलपूर : देशात अनेक ठिकाणी सध्या छापेमारी सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सध्या धाडसत्र सुरू आहे. जालन्यानंतर आता एका अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकल्याची माहिती मिळाली. हा ARTO मधील अधिकारी आहे. या अधिकाऱ्याच्या घरी कोट्यवधी रुपये आणि पगारापेक्षा कमाई जास्त अशी तऱ्हा झाली. या अधिकाऱ्याच्या घरी पगारापेक्षा 650 पट अधिक मालमत्ता सापडली आहे. जबलपूरचे ARTO (प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी) संतोष पॉल यांच्या घरासह अनेक ठिकणी धाड टाकली. या धाडीमुळे एकच खळबळ उडाली. ईओडब्ल्यूच्या पथकांनी एकाच वेळी पॉलच्या शताब्दीपूरम येथील आलिशान पेंटहाऊस आणि गार्हा फाटक येथील त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीवरही धाड टाकली. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पॉल यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची तक्रार ईओडब्ल्यूकडे आली होती. ही तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ईओडब्ल्यूने हा तपास सुरू केला. हे धाडसत्र आणि कागदपत्रांची पडताळणी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती.

    Jalna IT Raid : जालन्यातील 'त्या' कंपनीत नेमकं काय बनवलं जातं, जिथून जप्त झाली 390 कोटींची संपत्ती? वाचा Inside Story

    संतोष पॉल यांच्याकडे त्यांच्या पगारापेक्षा 650 पट जास्त बेहिशेबी मालमत्ता असल्याचं या धाडीतून समोर आलं. 300 कोटींहून अधिक संपत्तीचे ते मालक असल्याची चर्चा आहे. संतोष पॉल हे जवळपास 4 वर्षांपासून जबलपूरमध्ये तैनात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओच्या विविध कामांमध्ये त्यांचे अनेक नातेवाईक कंत्राटी आणि भागीदारही आहेत. संतोष पॉल यांच्या विरोधात गेल्या काही वर्षांत बनावट जात प्रमाणपत्र, गांजा विक्रीच्या खोट्या आरोपाखाली ऑटोचालकाला गोवण्याची धमकी देणे, नोंदणी, परवाना, परमिट यासह व्हीआयपी क्रमांकाचे मनमानी शुल्क आकारणे, कमिशन घेणे अशी अनेक प्रकरणं उघड झाली आहेत.

    Jalna raid : 260 अधिकारी, 120 गाड्यांचा ताफा अन् नवरदेवाची गाडी, 390 कोटींच्या धाडीचे PHOTOS

    एआरटीओमध्ये पदावर असताना संतोष पॉल यांनी कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचंही या धाडीनंतर समोर आली. एवढी संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले. याप्रकरणी ईओडब्ल्यूमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. पॉल यांच्याकडे महालासारखी 6 आलिशान घरं आणि महागड्या गाड्या आहेत. त्यांना गाड्या आणि फार्महाऊसची आवड असल्याचं ते सांगतात. मात्र एवढी संपत्ती आली कुठून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या