Home /News /national /

मतांसाठी अजब कारभार, लोकगीतांवर लगावले जबरदस्त ठुमके, VIDEO VIRAL

मतांसाठी अजब कारभार, लोकगीतांवर लगावले जबरदस्त ठुमके, VIDEO VIRAL

ओपन ट्रकमध्ये उमेदवाराचा प्रचार करत असताना कार्यकर्ता आणि एक महिला या ट्रकमध्ये लोकगीतांवर नाचत आहेत.

    सागर, 30 ऑक्टोबर : मतांसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. कोणी वस्तू वाटतं तर कोणी मतांसाठी आश्वासनांची खिरापत देतं. पण एका कार्यकर्त्यानं चक्क स्टेजवर जाऊन ठुमके लगावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मध्य प्रदेशात सध्या पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. 28 जागांसाठी 3 नोव्हेंबरला या पोटनिवडणुका होणार आहे. मध्य प्रदेशात भाजप विरुद्ध काँग्रेस चुरशीची लढत ऐन रंगात आली असतानाच भाजपच्या एका कार्यकर्त्यानं मतांसाठी चक्क ठुमके लगावले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मतं आणि मनं वळवण्यासाठी प्रत्येक उमेदवार सर्वतोपरीनं प्रयत्न करत आहे. मध्य प्रदेशातील सागर गावात प्रचार सभेदरम्यान भाजपच्या एका कार्यकर्त्यानं मतांसाठी चक्क लोकगीतांवर ठुमके लगावले आहेत. उमेदवार गोविंदसिंग राजपूत यांना मत द्यावं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे. हे वाचा-प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसी चढली 125 फूट उंच पाण्याच्या टाकीवर ओपन ट्रकमध्ये उमेदवाराचा प्रचार करत असताना कार्यकर्ता आणि एक महिला या ट्रकमध्ये लोकगीतांवर नाचत आहेत. प्रचारासाठी या लोकगीतांचा वापर करण्यात आला आहे. आजही सागर आणि आसपासच्या जिल्ह्यात लोकगीते खूप लोकप्रिय आहेत. लग्नात लोकगीतेही बरीच ऐकली जातात. त्यामुळे मतदारांचं मन वळवण्यासाठी इथे लोकगीतांचा आधार घेतला जात असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या