धक्कादायक! हुंडा कमी दिल्याने लग्नानंतर घरी जाताना नवरीला अर्ध्या वाटेतच उतरवलं आणि...

धक्कादायक! हुंडा कमी दिल्याने लग्नानंतर घरी जाताना नवरीला अर्ध्या वाटेतच उतरवलं आणि...

लग्नात हुंडा कमी मिळाला म्हणून नवऱ्याने नवरीला चक्क वाटेतच उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

भोपाळ, 26 फेब्रुवारी : लग्नात हुंडा दिला म्हणून छळ करण्याच्या अनेक घटना घडत असतात. आता मध्य प्रदेशात लग्नात हुंडा कमी मिळाला म्हणून नवऱ्याने नवरीला चक्क वाटेतच उतरवलं आणि माहेरी पाठवलं. यानंतर नवरीच्या घरची मंडळी तिच्यासह थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी नवरदेवालाच ठाण्यात बोलावलं. सुरुवातीला त्याने येण्यास टाळाटाळ केली पण शेवटी आला. पोलिसांनी त्याला सक्त ताकीद दिल्यानंतर नवरीला घेऊन तो गेला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 25 फेब्रुवारीला बहिणीचं लग्न झाल्याचं इंद्रजीत जाटव यांनी सांगितलं. बुधवारी सायंकाळी सहा वाजता मुलीची लग्नानंतर पाठवणी केली. मात्र घरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर मुलीला 500 मीटरवर गाडीतून उतरवलं. त्यानंतर मुलगी रडतच घरी आली. शेवटी मुलीसह घरच्या मंडळींनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी यात मध्यस्थी करत प्रकरण मिटवलं.

दरम्यान, पोलिसांनी सुरुवातीला फोनवरून नवऱ्याला घडल्या प्रकाराबद्दल विचारलं तेव्हा नवऱ्याने मुलगी स्वत:हून गाडीतून उतरल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगण्यात आलं. पोलिस स्टेशनमध्ये येताच नवऱ्याला पोलिसी खाक्या दाखवून मुलीला घेऊन जाण्यास सांगितलं.

नवरीच्या घरच्यांनी हुंड्यात कमी साहित्य दिल्यानं तिला उतरवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. लग्नाच्या विधीवेळी नवरदेवाला पैसेही दिले होते. नवरीचा भाऊ सैन्यात आहे तरीही पैसे कमी दिल्याचं नवऱ्याने म्हटल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. याबाबत नवरीच्या कुटुंबाने पोलिसांकडे येऊन तक्रार केली. शेवटी त्यांनीच दोन्ही कुटुंबीयांना समजावून सांगत घरी पाठवले.

First published: February 26, 2020, 10:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या