मराठी बातम्या /बातम्या /देश /

सोयाबीनची कापणी करून घरी चाललेल्या शेतमुजरांच्या गाडीला अपघात, 6 जणांचा मृत्यू

सोयाबीनची कापणी करून घरी चाललेल्या शेतमुजरांच्या गाडीला अपघात, 6 जणांचा मृत्यू

यावेळी काही शेतमजूर ड्रायव्हरला मदत करण्यासाठी खाली उतरले होते. तर काही जण हे गाडीतच बसलेल होते.

यावेळी काही शेतमजूर ड्रायव्हरला मदत करण्यासाठी खाली उतरले होते. तर काही जण हे गाडीतच बसलेल होते.

यावेळी काही शेतमजूर ड्रायव्हरला मदत करण्यासाठी खाली उतरले होते. तर काही जण हे गाडीतच बसलेल होते.

  • Published by:  sachin Salve
मध्य प्रदेश, 06 ऑक्टोबर : मध्य प्रदेशमधील धार (Dhar) जवळ झालेल्या एका भीषण अपघातात (Road Accident) 6 शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी 20 मजूर जखमी झाले आहे. यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धार जवळील इंदुर-अहमदाबाद महामार्गावर ही घटना घडली आहे. सोयाबीनची कापणी करून हे शेतमजूर पिकअप व्हॅनने केसूर इथून टांडा इथं जात होते. वाटेत पिकअप व्हॅन पंक्चर झाली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला व्हॅनचे टायर बदली करण्यात येत होते. यावेळी काही शेतमजूर ड्रायव्हरला मदत करण्यासाठी खाली उतरले होते. तर काही जण हे गाडीतच बसलेल होते. त्याचवेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या टँकरने पिकअप व्हॅनला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रस्ताच्या बाजूला उभे असलेल्या शेतमजुरांसह ट्रॅकने व्हॅनला जोरात धडक दिली. यात चार शेतमजूर हे चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागेवर मृत्यू झाला. तर गाडी बसलेल्या दोन मंजुरांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात 20 मजूर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस आणि रुग्णावाहिका पोहोचल्या.  जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या 20 मजुरांपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील दोन जणांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने इंदुर येथील रुग्णालयात हलवलण्यात आले आहे. या अपघातानंतर टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. तिरला पोलीस स्टेशनमध्ये या अपघातबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार टँकरचालकाचा शोध सुरू आहे. भरधाव वेगात आलेल्या टँकरचालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही, त्यामुळे हा अपघात घडला. पिकअप व्हॅनमध्ये सर्वजन शेत मजूर होते. हे सर्वजण टांडा येथील राहणारे होते. हे मजूर केसूर इथं सोयाबीन कापणीसाठी गेले होते. सोयाबीन कापणी करून आपल्या गावी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. सहा शेतमजुरांच्या अपघाती निधनामुळे टांडा गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
First published:

पुढील बातम्या