इंदूर, 16 जानेवारी: इंदूरमध्ये (Indore) 12 जानेवारीला झालेल्या खळबळजनक दुहेरी हत्याकांडाचा (Double Murder) शुक्रवारी पोलिसांनी खुलासा केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कुलदीपला अटक केली आहे. आरोपीनं पत्नी आणि 11 वर्षाच्या मुलाची हत्या केली होती. या महिलेला पूर्वी चार पती होते. कुलदीप तिचा पाचवा पती होता. कुलदीपनं तिला तिच्या पूर्वीच्या पतीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. यामुळे रागाच्या भरात त्याने ही हत्या केली. हे कुटुंब चार दिवसांपूर्वी रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रातून इंदूरला आलं होतं. खून करण्यापूर्वी आरोपीने पत्नीच्या पूर्वीच्या पतीला सांगितले की, आता तूला तिच्यासोबत चांगली झोप येईल. तू आता तिच्यासोबतच रहा.
बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश धाम येथे 12 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. एका घरात महिला आणि एका मुलाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तपासात महिलेचे नाव शारदा आणि मुलाचे नाव आकाश असल्याचे समोर आलं होतं. आकाश हा महिलेचा 11 वर्षांचा मुलगा होता. महिलेचा पती कुलदीप हा फरार असल्याची माहिती मिळाली. कुलदीप चार दिवसांपूर्वी नोकरीच्या शोधात कुटुंबासह महाराष्ट्रातून इंदूरला आला होता. चौथ्या दिवशीच हत्या झाली. हे कुटुंब मंगेश नावाच्या व्यक्तीच्या घरी राहत होते. ही घटना घडली तेव्हा मंगेशही घरी नव्हता. संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना हत्येची माहिती मिळाली.
महिलेच्या पूर्वी पतीनं केलं प्लानिंग
याबाबत पोलिसांनी मंगेशची बारकाईनं चौकशी करून त्याचा मोबाईल शोधला. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या कॉल रेकॉर्डिंगवरून पोलिसांना महत्त्वाचा सुगावा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीचा शोध सुरू केला आणि अवघ्या 24 तासांत त्याला महाराष्ट्रातून अटक केली. पोलिसांनी सांगितले की, कुलदीप आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रातील अकोला येथून नोकरीनिमित्त इंदूर येथे आला होता. पूर्ण प्लॅन करून मंगेशनं त्याला कुटुंबासमवेत येथे बोलावले होते आणि तो त्याच्याच घरी राहिला होता. मंगेश आणि मृत शारदा यांचे पूर्वी संबंध असल्यानं काही काळ शारदाने मंगेशशी बोलणे बंद केलं. मंगेशला शारदासोबतचे आपले नाते पूर्वपदावर आणायचं होतं. म्हणूनच त्याने एक योजना आखली.
असा झाला खून
दुसरीकडे सर्वजण घरी थांबले असताना शारदा आणि मंगेश यांना कुलदीपने आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. तेव्हाच त्याने दोघांना संपवण्याची योजना आखली. मिळालेल्या माहितीनुसार, शारदाही काही दिवसांपासून कुलदीपवर नाराज होती आणि तिला त्याच्यापासून सुटका हवी होती. यात त्याला मंगेशही मदत करत होता. याची कल्पना कुलदीपला आधीच होती. त्यामुळे 12 जानेवारीच्या संध्याकाळी कुलदीपने शारदा आणि आकाशला झोपलेले पाहिले तेव्हा त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यांनी रिकामे गॅस सिलिंडर उचलून दोघांवर हल्ला केला. त्यानंतर दोघांनीही चाकूने गळा चिरला. त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यानं दोघांच्या तोंडात कापडाचा गोळा भरला होता.
पोलिसांना मिळाले कॉल रेकॉर्डिंग
तुम्हाला सांगतो, मंगेश गावंडे आणि आरोपी कुलदीप डिगे यांच्यात मोबाईलवरून झालेली प्रकरण पोलिसांनी पकडली होती. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सायंकाळी चारच्या सुमारास दोघांमध्ये मराठीत संभाषण झाले. एका मराठी भाषिक पोलिसाकडून पोलिसांनी त्याचे भाषांतर करून घेतले तेव्हा असे आढळून आले की कुलदीप मंगेशला सांगत होता- “माझे आयुष्य चांगले चालले होते. तुम्ही आम्हाला इंदूर का बोलावले? शारदा वाईट आहे, पण तू माझा विश्वासघात केलास. तूही मरशील आणि मीही आज मरणार आहे. खोलीची चावी बाजूला ठेवली आहे. दार उघड, तू तिच्या जवळ चांगली झोप येईल. तू आता शारदा सोबत रहा."
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.