Home /News /national /

पत्नी- मुलाचा मृतदेह पडला होता खोलीत, बाप बोलतो...''पळून जा, नाहीतर पोलीस पकडतील''

पत्नी- मुलाचा मृतदेह पडला होता खोलीत, बाप बोलतो...''पळून जा, नाहीतर पोलीस पकडतील''

दुहेरी हत्येनं (Double Murder in Indore) खळबळ उडाली आहे. बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे.

    मध्य प्रदेश, 14 जानेवारी: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये दुहेरी हत्येनं (Double Murder in Indore) खळबळ उडाली आहे. बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. येथील एका घरात 38 वर्षीय महिला आणि 11 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. धारदार शस्त्राने गळा चिरून दोघांची हत्या करण्यात आली आहे. घटनेनंतर महिलेचा पती फरार आहे. पत्नी आणि मुलाची हत्या करून पती पळून गेल्याचा संशय आहे. महाराष्ट्रातील अकोला येथील रहिवासी असलेला कुलदीप चार दिवसांपूर्वी कुटुंबासह इंदूरला आला होता. हे कुटुंब रोजगाराच्या शोधात इंदूरला आलं होतं. नोकरी मिळेपर्यंत तो त्यांचा दूरचा आणि पूर्वीचा ओळखीचा असलेला मंगेशच्या बाणगंगा येथे भाड्याच्या घरात राहत होते. हेही वाचा- आयर्लंडनं केली खळबळजनक निकालाची नोंद, वेस्ट इंडिजचा दिला पराभवाचा धक्का मंगेश एका खासगी कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी तो कामावर गेला. संध्याकाळी तो परत आल्यावर पाहिलं की खोलीला कुलूप लावलेलं दिसलं. मंगेशने कुलदीपला फोन करून खोलीची चावी मागितली असता तो काहीतरी वेगळं बोलू लागला आणि मंगेशला घटनास्थळावरून पळून जाण्यास सांगितलं. त्यांनी मंगेशला घटनास्थळावरून लवकर पळ काढ अन्यथा पोलीस त्याला पकडतील असं सांगितलं. पोलिसांनी सुरु केला प्रकरणाचा तपास मंगेशनं त्याचं ऐकलं नाही आणि त्यानं दुसऱ्या चावीनं खोली उघडली असता त्याला कुलदीपची पत्नी आणि मुलाचा मृतदेह घरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. दोघांचे मृतदेह बेडवर पडले होते. झोपेत असताना दोघांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर धारदार शस्त्राने मानेवर वार करण्यात आले. हल्ल्यानंतर कुलदीप फरार आहे. पोलिसांनी तांत्रिक आधारावर तपास केला असता तो महाराष्ट्रात असल्याचे निष्पन्न झाले. कुलदीपच्या अटकेसाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके महाराष्ट्रात पाठवली आहेत. लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. हेही वाचा- नातेवाईकाचे हातपाय बांधून विवाहितेवर सामूहिक बलात्कार, जंगलात नेऊन गाठला विकृतीचा कळस  पोलिसांनी मंगेशची तासनतास चौकशी करून हत्येमागील कारण काय असावे, याबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. कुलदीपला अटक केल्यानंतरच हत्येमागील मूळ कारणाची माहिती मिळू शकेल, असा पोलिसांचा दावा आहे. महिला आणि मुलाची हत्या करून कुलदीप फरार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस सध्या कुलदीपचा संशयित म्हणून विचार करत आहेत. धारदार शस्त्राने हत्या बाणगंगा पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील एका घरात एक महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला आहे. शारदा आणि आकाश असं हत्या झालेल्यांचं नाव आहे. दोघांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. घटनेनंतर महिलेचा पती कुलदीप हा फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. कुलदीप ताब्यात आल्यानंतरच हत्येचे गूढ उकलणं शक्य आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Indore, Maharashtra

    पुढील बातम्या