मराठी बातम्या /बातम्या /देश /

5 वर्षीय मुलावर कुऱ्हाडीने वार करत केले 7 तुकडे; जन्मदात्याच्या अमानुष कृत्याचं कारण वाचून हादराल

5 वर्षीय मुलावर कुऱ्हाडीने वार करत केले 7 तुकडे; जन्मदात्याच्या अमानुष कृत्याचं कारण वाचून हादराल

एका पित्याने (Father)आपल्या मुलाचे (Son) 7 तुकडे केले.

एका पित्याने (Father)आपल्या मुलाचे (Son) 7 तुकडे केले.

एका पित्याने (Father)आपल्या मुलाचे (Son) 7 तुकडे केले.

  • Published by:  Pooja Vichare

मध्य प्रदेश, 05 डिसेंबर: एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (MP News)अलीराजपूर येथे एका पित्याने (Father)आपल्या मुलाचे (Son) 7 तुकडे केले. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांना मुलाला भूतबाधा झाल्याचा संशय होता.

अलीराजपूर एसडीओपी श्रद्धा सोनकर (MP Police)यांनी सांगितले की, जिल्ह्यातील खारखडी गावात एका पित्यानं आपल्या 5 वर्षाच्या मुलाचे कुऱ्हाडीने 7 तुकडे करून हत्या केली. आरोपी वडील दिनेश डावर याने चौकशीत सांगितले की, मुलाचा जन्म झाल्यापासून पत्नीची तब्येत खराब आहे. घरातही वातावरण चांगलं नव्हतं आणि बऱ्याच प्रकारच्या समस्या येत होत्या.

आरोपी वडिलांना अटक, महिलेचा शोध सुरू

आरोपी वडिलांनी सांगितलं की, याचवेळी त्याला जवळच्या गावात राहणारी एक महिला भेटली, जिला आपण आपली गुरुमाता मानतो. तिला या सर्व गोष्टी सांगितल्या. महिलेने आपल्या मुलाला भूतबाधा झाल्याचं सांगितलं. यानंतर वडिलांनी 5 वर्षीय मुलावर कुऱ्हाडीनं वार करून त्याचे सात तुकडे केले आणि मृतदेह जमिनीत पुरला.

हेही वाचा- IND vs NZ: शुभमन गिलचं कौतुक करत सचिन म्हणतो, 'आता ती वेळ आली आहे' 

SDOP श्रद्धा सोनकर यांनी सांगितलं की, पोलिसांनी आरोपी वडील दिनेश डावर याला अटक केली आहे, वडिलांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून महिलेचा शोध सुरू केला आहे. या महिलेनं दिनेशच्या मुलावर भूताची छाया असल्याचं सांगितलं होतं.

First published:

Tags: Madhya pradesh