• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Facebook वरील मित्राने केला घात; मध्य प्रदेशातील तरुणाकडून नागपुरातील तरुणीवर बलात्कार, प्रकृती गंभीर

Facebook वरील मित्राने केला घात; मध्य प्रदेशातील तरुणाकडून नागपुरातील तरुणीवर बलात्कार, प्रकृती गंभीर

धक्कादायक म्हणजे अत्याचार झालेली पीडिता ही महाराष्ट्रातली (Maharashtra) आहे.

 • Share this:
  मध्य प्रदेश, 20 नोव्हेंबर: मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एका अत्याचाराची बातमी समोर येतेय. धक्कादायक म्हणजे अत्याचार झालेली पीडिता ही महाराष्ट्रातली (Maharashtra) आहे. महाराष्ट्राच्या नागपूर (Nagpur) येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची बिरुलबाजारच्या किशोर नावाच्या मुलासोबत मैत्री झाली. सोशल मीडिया फेसबूकवर या दोघांची मैत्री झाली. सध्या पीडितेवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काय आहे नेमकी घटना महाराष्ट्र राज्यातल्या अल्पवयीन मुलीला बैतूल फिरण्याच्या बहाण्यानं आणून 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीची तब्येत गंभीर असून नागपूरच्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. हेही वाचा- 250 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेची सत्ता होती महिलेच्या हाती नागपूरमधल्या सेंदुरजना येथील अल्पवयीन मुलीची ओळख मध्यप्रदेशातल्या किशोर या तरुणासोबत झाली. दोघांची ओळख फेसबूकवर झाली. बिरुल बाजार येथील रहिवाशी असलेला किशोर आणि अल्पवयीन मुलगी सतत सोशल मीडियावर बोलत होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये वारंवार संवाद होत होता. त्याचवेळी किशोरनं पीडितेला प्रभातपट्टण येथे बोलावले. अल्पवयीन मुलगी किशोरवर विश्वास ठेवून प्रभातपट्टणला आली. जेथे किशोर तिला भेटला आणि बालाजीपुरम फिरवण्याच्या बहाण्यानं 9 नोव्हेंबरला बैतूलला घेऊन आला. हेही वाचा- एका सुंदर Love Story चा वाईट The End,संपूर्ण कुटुंबाचा अंत  बैतूलमध्ये किशोरनं खंजनपूर येथे आपल्या मित्राचं घर घेतलं. जेथे निघून किशोरनं तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर पीडितेला रक्तस्राव होऊ लागला आणि तिच्या तब्येत बिघडली. त्यानंतर किशोरनं तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालय प्रशासनाला या प्रकरणी संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना याबाबतची कल्पना दिली. माहिती मिळताच कोतवाली पोलीस रुग्णालयात दाखल झाले. कोतवाली टीआय रत्नाकर हिंगवे यांनी सांगितलं की, पीडित मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर किशोरला ताब्यात घेण्यात आलं आहे. हेही वाचा- देशाची राजधानी अजूनही  Air Pollution च्या विळख्यात, आजही वाईट हवा पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयातून तिला नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. जिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: