Home /News /national /

वाढदिवशीच 3 वर्षांच्या चिमुरड्याची निर्घुण हत्या, पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

वाढदिवशीच 3 वर्षांच्या चिमुरड्याची निर्घुण हत्या, पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

एका 3 वर्षांच्या मुलाची त्याच्या वाढदिवसाच्या (birthday) दिवशीच निर्घृणपणे हत्या (murder)करण्यात आली.

    मध्य प्रदेश, 21 ऑक्टोबर: मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) खंडवा (Khandwa district) जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका 3 वर्षांच्या मुलाची त्याच्या वाढदिवसाच्या (birthday) दिवशीच निर्घृणपणे हत्या (murder)करण्यात आली. मुलगा बुधवारी दुपारी स्वतःच्या घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. कुटुंबातील लोकं त्याचा शोध घेत होते, मात्र त्याचा काहीही शोध लागला नाही. त्यानंतर संध्याकाळी उशिरा त्याचा मृतदेह घराजवळील एका निर्जन घरात एका पोत्यात बांधलेला आढळून आला. त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. हेही वाचा- शिर्डी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत, अधिकाऱ्यानं महिला साईभक्तांना पाठवले अश्लील Video  मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी मुलाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुलाच्या मानेवर जखमेच्या खुणा आहेत, ज्यावरून असं मानलं जातं की त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. सध्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना खंडवा जिल्ह्यातील मुंडी शहरात घडली. येथे प्रभाग क्रमांक 8 मध्ये अक्षांश कोठारे नावाच्या3 वर्षांच्या मुलाचा बुधवारी वाढदिवस होता. तो घराभोवती खेळत होता. त्यानंतर तो तेथून गायब झाला. मुलाचे वडील आणि कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात अक्षांश यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील लोक त्याचा शोध घेत होते. पण रात्री 10 वाजता परिसरातील काही लोक एका निर्जन घरात पोहोचले. जिथे अक्षांशचा मृतदेह एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला, ते पाहून सगळेच स्तब्ध झाले. हेही वाचा- 24 तासात दोन नवजात मुलींची हत्या, 1 दिवसाच्या बाळाचं आईनंच दाबलं उशीनं तोंड  दुसरीकडे, पोलिसांचे म्हणणे आहे की सध्या हत्येचं कोणतंही स्पष्ट कारण समोर आलेलं नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरलं असून लोक हैराण आणि संतापात आहेत, वातावरण शांत झाल्यानंतर चौकशी केली जाईल,असं पोलिसांनी सांगितलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या