Home /News /national /

6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला घेऊन परीक्षेला पोहोचला पती, 986 किमी दुचाकीनं केला प्रवास

6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला घेऊन परीक्षेला पोहोचला पती, 986 किमी दुचाकीनं केला प्रवास

या दाम्पत्याची माहिती जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचली आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला.

    ग्वाल्हेर, 07 सप्टेंबर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून 85 किमी सायकलवरून त्याला परीक्षा केंद्रावर सोडल्याची एका घटना समोर आली होती. याच घटनेची थोडी वेगळ्या पद्धतीनं पुनरावृत्ती झाली आहे. 6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला सुरक्षितपणे परीक्षा केंद्रावर पोहोचून परीक्षा देता यावी यासाठी पतीनं तब्बल 986 किमीचा प्रवास केला. या तरुणानं आपल्या पत्नीला दुचाकीवरून 986 किमी बसवून परीक्षा केंद्रावर पोहोचवलं आहे. कोरोनाच्या काळात इतर वाहनांनी प्रवास करणं जोखमीचं असल्यानं पती-पत्नीनं थेट बाईक घेऊन प्रवास करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा देण्याची जिद्द इतकी पक्की होती की दोघांनी झारखंड ते ग्वाल्हेर एवढं अंतर दुचाकीवर पार केलं. त्यांच्या धाडसाचं आणि जिद्दीचं कौतुक केलं आहे. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागलं आहे. हे वाचा-प्रतीक्षा संपली! याच आठवड्यात मिळणार कोरोनाची लस, रशियानं केलं जाहीर मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मांझी यांची पत्नी सोनी हंबरम यांना ग्वाल्हेरमध्ये परीक्षा द्यावी लागणार होती. धनंजय यांची पत्नी 6 महिन्यांची गर्भवती आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूमुळे स्कूटरने ग्वाल्हेरला जाणे योग्य वाटले. यासाठी हे जोडपे परीक्षेच्या काही दिवस आधीच ग्वाल्हेरला रवाना झाले. ग्वाल्हेर गाठल्यानंतर धनंजयने 10 दिवसांसाठी 1500 रुपये भाडं देऊन खोली घेतली आणि राहू लागले. या दाम्पत्याची माहिती जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचली आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्याचवेळी माध्यमांशी बोलताना धनंजय म्हणाले की अदानी ग्रूपनंही त्यांना मदत केली आहे. अदानी समूहाने आता त्याला घरी परतण्यासाठी विमानाचे तिकीट दिलं. जिल्हा शिक्षक अधिकाऱ्यांनी या दाम्पत्याची व्यवस्था परीक्षा केंद्राजवळ केली आणि त्यांना 5000 रुपये आर्थिक मदतही दिली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Madhya pradesh

    पुढील बातम्या