रचित दुबेसागर (मध्य प्रदेश), 28 मे : कोरोनाच्या संकटात सध्या फ्रंट लाईन कर्मचारी म्हणजे डॉक्टर, नर्स, सफाई आणि आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. मात्र मध्य प्रदेशात एका कोरोना वॉरियरवरच वाईट वेळ आली. मध्य प्रदेशातील सागर येथे एक कोरोना योद्धा कामावर असतानाच बेशुद्ध पडले. मात्र लोकांना वेळेवर उपचार देणाऱ्या या कर्मचाऱ्यालाच उचपार मिळाले नाही. ही घटना बुंदेलखंड मेडिकल कॉलेजच्या गेटजवळ घडली. दिवसरात्र काम करणाऱ्या योद्ध्याला थकव्यामुळं चक्कर आली. मात्र त्याला मेडिकल कॉलेजनं प्रवास देण्यास नकार दिला. त्यानंतर सहकारी कर्मचार्यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथं उपचारानंतर आता या योद्ध्याची प्रकृती ठीक आहे.
या घटनेनं सर्वांना धक्का बसला. कोरोना रुग्णांच्या सेवेत गुंतलेल्या कोरोना योद्धाची तब्येत बिघडली आणि बराच वेळ ते रस्त्यावरच पडून होते. या योद्ध्याचे नाव आहे हिरालाल प्रजापती होती. ते तो रुग्णवाहिका 108च्या पॅरा मेडिकल स्टाफमध्ये तैनात आहे. हिरालाल यांन पीपीई किट परिधान केले होते आणि ते कोरोना रुग्णाला घेऊन बीएमसी येथे पोहोचले. त्यावेळी हिरालाल प्रजापती यांनी ड्यूटी मोतीनगर येथे होती. रुग्णवाहिका घेऊन बीएमसीजवळ येताच ते अचानक खाली पडले. रुग्णवाहिकेतून रुग्णांना खाली उतरवण्यासाठी ते खाली उतरले ते बेशुद्धच पडले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
वाचा-कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी गुजरातमध्ये 'धन्वंतरी रथ', काय आहे मोहीम जाणून घ्यावाचा-कोरोना पॉझिटिव्ह जावयानं लावली सर्वांची वाट, नवरा-नवरीसह 100 जण क्वारंटाइनड्यूटीवर होते कोरोना वॉरिअर
हिरालाल प्रजापती यांना निपचीत पडलेले पाहून इतर कर्मचारीही घाबरले. त्यांना लगेचच बीएमसीमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना गर्मीचा त्रास झाल्याचं समोर आले. आश्चर्याची बाब म्हणजे हीरालाल यांना अशा अवस्थेतही बीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. त्यानंतर पॅरामेडिकल कर्मचार्यांनी त्याला ताबडतोब जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू झाले.
गर्मीमुळं होतोय त्रास
सध्या उन्ह वाढल्यामुळं गर्मीचा त्रास जास्त होत आहे. यात कोरोना वॉरिअर पीपीई किट परिधान केल्यामुळं त्यांना जास्त त्रास होता. हिरालाल यांनाही असाच त्रास झाला. श्वास घेण्याचा त्रास झाल्यामुळं हिरालाल यांना चक्कर आली.
वाचा-Lockdown 5.0 ची तयारी की EXIT plan? प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.