धक्कादायक! रोजच्या टोमण्यांना कंटाळून कोरोना वॉरियरनं उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

अत्यंत भावुक अशी सुसाईड नोट वाचल्यानंतर पोलिसांनी या कोरोना वॉरियरची सगळी माहिती घेतली.

अत्यंत भावुक अशी सुसाईड नोट वाचल्यानंतर पोलिसांनी या कोरोना वॉरियरची सगळी माहिती घेतली.

  • Share this:
    इंदूर, 02 नोव्हेंबर : आरोग्य सेवक असो पोलीस असो किंवा कोरोनाच्या काळात आपलं महत्त्वपूर्ण योगदान देणारा तरुण असो त्यांचं श्रेय आणि काम खूप मोलाचं आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेकदा या वॉरियर्सना समस्यांना, लोकांच्या टोमण्यांना किंवा टीकांचा सामना करावा लागतो. अशाच एका घटनेला वैतागलेल्या कोरोना वॉरियरने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. टोमणे आणि टीकेला वैतागून कोरोना वॉरियर कर्मचाऱ्यानं आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासात पोलिसांना या कर्मचाऱ्याजवळ सुसाईड नोट सापडली आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. जितेंद्रचे वडील बाबूलाल यादव रा. कुलकर्णी यांचे भट्ट असे मृत नगरसेवकाचे नाव आहे. जो सुभाष नगर पाण्याच्या टाकीवर व्हॉल्व्ह मॅन म्हणून तैनात होता. पोलिसांना मृतांकडून एक सुसाइड नोट मिळाली आहे, ज्यात मृत कोरोना वॉरियर लिहिले आहे की त्याने कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यान त्याने बरीच सेवा केली. त्याला अनेक लोकांनी तुच्छ लेखलं आणि टोमणे आणि टीकेचाही सामना करावा लागला. जे दुसऱ्याला खालच्या पातळीचे समजतात त्यांना देव सुखी ठेवो. असंही त्याने या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. हे वाचा-कोरोना रिटर्न! फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये पुन्हा 4 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अत्यंत भावुक अशी सुसाईड नोट वाचल्यानंतर पोलिसांनी या कोरोना वॉरियरची सगळी माहिती घेतली. हा तरुण नैराश्येत होता आणि त्यातून धक्कादायक पाऊल उचललं आहे. लॉकडाऊनमध्ये केलेल्या मेहनतीचं फळ तर मिळालं नाहीच पण लोकांच्या टीकांचा सामना करावा लागला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये घडली आहे. त्याचे वडील ग्वाल्हेरला गेले असताना हा तरुण घरातून बाहेर पडला. त्यांनंतर त्याने रात्री 2 वाजेपर्यंत एका मित्रासोबत बोलल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मिळालेल्या माहिती आणि सुसाईड नोटवरून पोलिसांचा तपास सुरू आहे.
    First published: