Home /News /national /

MP मध्ये सत्तासंघर्ष; ज्योतिरादित्य यांच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम

MP मध्ये सत्तासंघर्ष; ज्योतिरादित्य यांच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम

जोतिरादित्य यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला आहे.

    भोपाळ, 11 मार्च : मध्यप्रदेशात पुन्हा एकदा सत्तासंघर्ष उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे. जोतिरादित्य यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला आहे. ज्योतिरादित्य यांच्यासह 21 आमदारांनी राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली आहे. अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 12 वाजता जोतिरादित्य भाजप प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहितीही मिळत आहे. दरम्यान गुरुवारी भाजप प्रवेश केल्यानंतर 13 मार्च रोजी ज्योतिरादित्य राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशात कमळ फुलणार असल्याचे संकेत मिळत असतानाच कमलनाथ डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या पवित्र्यात आहेत. मध्य प्रदेश सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आणि कमलनाथ समर्थक नेते पी. सी. शर्मा यांनी तसे स्पष्ट संकेत माध्यमांशी बोलताना दिले. विधानसभेतल्या संख्याबळावरून त्यांना प्रश्न विचारला असता शर्मा म्हणाले, "त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर आमच्याकडेही उपाय आहे. कुछ नया होने वाला है. कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल." कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचं बहुमत सिद्ध करून सरकारची 5 वर्ष पूर्ण करू असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे. कमलनाथ यांचा हा मास्टरस्ट्रोक खरंच ठरला तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील. भाजप आणि काँग्रेस कुणालाच सहज काही हाती लागणार नाही. पक्षफुटीचा तोटा काँग्रेसला होईल पण त्याबरोबर सहानुभूतीचीही शक्यता आहे. त्यामुळे हाच पर्याय कमलनाथ शेवटचा म्हणून स्वीकारतील, असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. तसं झालं तर मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटसचे सध्याचे प्रयत्न तरी अपुरे पडतील आणि त्यांनाही त्यांची रणनीती बदलावी लागेल. कमळ फुलण्याची शक्यता दिसायला अजून वेळ लागेल.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: BJP, Congress, Kamalnath government, Madhya pradesh, Madhya pradesh news

    पुढील बातम्या