Home /News /national /

खासदार असावा तर असा! दिव्यांग मुलांची गगन भरारी, या काँग्रेस नेत्यानं 53 विद्यार्थ्यांचं केलं स्वप्न पूर्ण

खासदार असावा तर असा! दिव्यांग मुलांची गगन भरारी, या काँग्रेस नेत्यानं 53 विद्यार्थ्यांचं केलं स्वप्न पूर्ण

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गगन भरारी खूप आशादायी आणि प्रेरणा देणारी ठरेल असा विश्वास देखील काँग्रेस खासदार विवेक तंखा यांनी व्यक्त केला आहे.

    जबलपूर, 01 डिसेंबर : वर्ष सरताना आणि नव्या वर्षात विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण करण्यासाठी काँग्रेस नेता आणि खासदारानं दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आहे. त्यांच्या स्वप्नांना स्फूर्ती आणि पंखांना बळ देण्यासाठी त्यांनी विमानातून 1 तासाची सफर घडवून आपली आहे. या काँग्रेस नेत्यानं जे केलं त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. विमानातून प्रवास करण्याचं स्वप्न कुणाचं नसतं. प्रत्येकाला एकदातरी हा अनुभव घ्यायचा असतो. दिव्यांग विद्यार्थ्यांचं हेच स्वप्न काँग्रेस नेत्यानं पूर्ण केलं आहे. flybigairlines या विमानातून तब्बल एक दोन नाही तर 53 विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा अनुभव काँग्रेस नेता आणि खासदार विवेक तंखा यांनी घडवून आणला आहे. विवेक तंखा यांनी स्वत: ट्वीट करून फ्लायबिग विमान सेवेचे यासाठी आभार देखील मानले आहेत. 'धन्यवाद फ्लायबिग : आमच्या दिव्यांग मुलांची स्वप्ने साकार केली. जे दुसऱ्यांसाठी जगतात त्याला खऱ्या अर्थानं जगणं म्हणतात. फ्लायबिगनं या मुलांना एक वेगळा अनुभव दिला त्यासाठी धन्यवाद असं कॅप्शन देत विवेक तंखा यांनी ट्वीट केलं आहे. हे वाचा-नागपूर पोलिसांनी विचारलं 'आज क्या प्रोग्राम है', कमेंट वाचून हसू आवरणार नाही! दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गगन भरारी खूप आशादायी आणि प्रेरणा देणारी ठरेल असा विश्वास देखील काँग्रेस खासदार विवेक तंखा यांनी व्यक्त केला आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा !! जस्टिस तंखा मेमोरियल रोटरी स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रेनच्या स्वप्नांना साकार करून फ्लायबिगने आपल्या सर्वांची मने जिंकली. नवीन वर्षाची अशी भेट माझ्यासाठी आणि या मुलासाठी आणखी काय असणार आहे असं विवेक तंखा यांना ट्वीट करून
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या