मध्य प्रदेशात राजकीय नाट्य सुरूच, प्लोअर टेस्टबाबत अजूनही सस्पेन्स

मध्य प्रदेशात राजकीय नाट्य सुरूच, प्लोअर टेस्टबाबत अजूनही सस्पेन्स

बहुमत चाचणीबाबत सस्पेन्स, विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेण्याची शक्यता

  • Share this:

भोपाळ, 16 मार्च : मध्य प्रदेशात 9 मार्चपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर आज कमलनाथ सरकारची प्लोअर टेस्ट होणार असं सांगितलं जात होतं. त्यासाठी भाजपने नजरकैदेत ठेवलेल्या आपल्या आमदारांना प्लोअर टेस्टसाठी सोडावं असं आवाहनही कमलनाथ यांनी केलं होतं. दरम्यान आमदारांच्या फोडाफोडीचं राजकारण टाळण्यासाठी सर्व आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं.आज प्लोअर टेस्ट होणार की नाही याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. तर आमच्याकडे बहुमत आहे असा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासह 22 आमदारांनीही राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर कमलनाथ सरकार कोसळेल असा अंदाज सर्व स्तरातून व्यक्त केला जात होता. कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सोमवारपर्यंतची वेळ देण्यात आली होती. सोमवारी सकाळी 11 वाजता प्लोअर टेस्ट होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र विधिमंडळाकडून आलेल्या परिपत्रकानुसार त्यामध्ये प्लोअर टेस्टचा उल्लेख नसल्यानं ही चाचणी होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.

काँग्रेस सरकारकडे बहुमत नाही त्यामुळे कमलनाथ सरकार कोसळणार असल्याचा दावा शिवराज सिंह यांनी केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या एका राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशातील राजकीय समीकरणं बदलतात का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. ध्य प्रदेशातील राजकारणाची समीकरणं ज्योतिरादित्य शिंदेंच्या एका निर्णयानं बदलताना पाहायला मिळत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह 22 आमदारांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ दिल्यानं कमलनाथ सरकारला मोठा धक्का बसला आहे. असं असलं तरीही मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्याकडे बहुमत आहे आणि त्यामुळे आपलं सरकार पडणार नाही असा दावा केला आहे. काँग्रेसचं सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा डाव यशस्वी होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचा-हे फक्त आपल्याच देशात होऊ शकतं! 'कोरोना'शी दोन हात करणाऱ्या मोदी सरकारला सॅल्युट

First published: March 16, 2020, 7:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading