मोठी बातमी! कंप्युटर बाबांच्या आश्रमावर बुलडोजर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मोठी बातमी! कंप्युटर बाबांच्या आश्रमावर बुलडोजर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

कंप्युटर बाबांच्या आश्रमावर बुलडोजर, 1 तासांत 40 एकरवरील इमारत जमीनदोस्त

  • Share this:

इंदूर, 08 नोव्हेंबर : जिल्हा प्रशासनानं रविवारी सकाळी कंप्युटर बाबांच्या आश्रमावर धडक कारवाई केली आहे. कंप्युटर बाबांकडून करण्यात आलेलं अतिक्रमण तातडीनं हटवण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं बुलडोजर आणून कारवाई केली आहे. या कारवाईला विरोध करणाऱ्या कंप्युटर बाबांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जिल्हा प्रशासन मध्य प्रदेशातील इंदूरने आज मोठी कारवाई करत जिल्हाधिकारी मनीष सिंह, एडीएम अजय देव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जमुडिहाबाशी गावात नामदेव दास त्यागी (कंप्युटर बाबा) यांनी केलेले अतिक्रमण हटविले असून एडीएम अजयदेव शर्मा व अन्य एसडीएम व पोलिस अधिकाऱ्यांची टीम आज सकाळपासून कारवाई करीत आहे. कंप्युटर बाबांच्या आश्रमातील बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली आहे.

हे वाचा-भरधाव मारुती स्विफ्ट कारला पाठीमागून जोरात धडक, 3 जण जागीच ठार

कंप्युटर बाबांच्या गोमतीगिरी आश्रमातील बेकायदा बांधकामे तोडण्याची कारवाई जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने सुरू करण्यात आली. त्यावेळी स्थानिक आणि आश्रमातील व्यक्तींनी या कारवाईत व्यत्यय आणू नये म्हणून पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे. सकाळी 8 वाजता ही कारवाई सुरू झाली आहे. पालिकेनं पक्क्या बांधकामावर हातोडा घातला आहे. मागच्या विधानसभा पोटनिवडणुकीत कंप्युटर बाबांनी 28 ठिकाणी यात्रा घेऊन पोहोचले होते. कारवाईचा निषेध करणाऱ्या बाबांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे वाचा-किरकोळ वादातून वाहिले रक्ताचे पाट, 2 गटांमधील तुबंळ हाणामारीचा VIDEO VIRAL

जिल्हा प्रशासनाने जे अतिक्रमट पाडलं आहे त्याची साधारण किंमत 80 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. 40 एकरहून अधिक परिसरात पसरलेला या आश्रमावर पालिकेनं बुलडोजर चालवला. या ठिकाणी नेमकं काय विकास करायचा यासंदर्भात महापालिकेकडून आराखडा तयार केला आहे. एक तासाच्या कारवाईत संपूर्ण आश्रम जमीनदोस्त करण्यात आला आहे. रविवारी सकाळी गोपनीय पद्धतीनं ही कारवाई करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी पूर्ण नियोजन देखील करण्यात आलं होतं.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 8, 2020, 11:03 AM IST

ताज्या बातम्या