उष्णतेचा कहर झाल्याने थेट 'सूर्या'विरुद्ध करावाईची नागरिकाची मागणी

उष्णतेचा कहर झाल्याने थेट 'सूर्या'विरुद्ध करावाईची नागरिकाची मागणी

'सूर्या'विरुद्ध कुठल्या कलमाखाली कारवाई करायची असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

  • Share this:

भोपाळ, 13 जून : यावर्षी उष्णतेने गर्मीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. गेल्या 65 वर्षात नव्हतं एवढं उन्ह यावर्षी अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रातलं चंद्रपूर हे शहर तर जगातलं सर्वात उष्ण शहर म्हणून ओळखलं जावू लागलं. सर्वच देशभरच उष्णतेची लाट आल्याने नागरिक घामाच्या धारांनी त्रासून गेले. या लाटेत देशभर शंभरच्या आसपास नागरिकांचा मृत्यूही झाला. मध्यप्रदेशातल्या अशाच एका उष्मा पीडित नागरिकाने थेट 'सूर्या'विरोधात कारवाई करावी अशी मागणी केलीय.

मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यात ही घटना घडलीय. 'सूर्या'चा प्रकोप वाढल्याने शिवपाल सिंह या नागरिकाने थेट पोलीस स्टेशनमध्येच अर्ज करून करावाईची मागणी केलीय. दिवसेंदिवस 'सूर्या'चा प्रकोप वाढतोय, भीषण गर्मी आहे, जगण असह्य झालंय, अनेकांचा जीव गेलाय, अशा परिस्थितीत जगायचं कसं? असा सवाल या नागरिकाने पोलिसांनाच विचारलाय. त्यामुळे 'सूर्या'विरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी या नागरिकांनी केलीय.

अनेक किचकट गुन्ह्यांची शिताफीने उकल करणारे पोलिसही या तक्रारीमुळे अचंबित झालेत. कारण त्यांच्यासमोर पहिल्यांदाच असं काही प्रकरण आलंय. आता 'सूर्या'विरुद्ध कुठल्या कलमाखाली कारवाई करायची असा प्रश्न पोलिसांना पडलाय. या नागरिकाने सोशल मीडियावरूनही ही तक्रार व्हायरल केलीय. अशा तक्रारी न करता झाडं लावलीत तर फायदा होईल असा सल्ला पोलिसांनी या नागरिकाला दिला आहे.

नागपूरात उष्णतेचे 47 बळी

मुंबई आणि परिसरात वातावरण थोड थंड झालं तरी विदर्भात उष्मा कायम आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये वाढतं ऊन जीवावर बेतत असून उष्माघातामुळं मृत्यू पडलेल्यांची संख्या ही 47 वर गेली आहे.

देशासह राज्यात सध्या पारा 48 पर्यंत पोहोचला होता.  त्याचा परिणाम हा आता माणसांवर होताना दिसत आहे. एकंदरीत सारी परिस्थिती पाहता नागरिकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे.  यापूर्वी नागपुरातील तापमान हे 48 डिग्री सेल्सिअसच्या देखील पुढे गेलेलं आहे. वातावरणातील उष्मा प्रचंड वाढल्यानं नागरिकांना दिवसा घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. पालिकेनं देखील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. वाढत्या उन्हामुळे आता सर्वांची नजर ही पावसाकडे लागली आहे.

First published: June 13, 2019, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading