मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी

Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chavan threatens to kill him

  • Share this:

भोपाळ, 9 ऑगस्ट : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र अर्जुनवार (32) आणि भरत अर्जुनवार (25) या दोन भावंडांनी त्यांना ही धमकी दिली असल्याचा शोध भोपाळच्या सायबर क्राइम पोलीसांनी लावलाय. त्या दोघांवरही सायबर क्राइमचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भोपाळचे पोलीस अधीक्षक सुदीप गोयंका यांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि भरत यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरच्या माध्यमातुन जीवेमारण्याची धमकी दिली आहे. सोशल मिडिया पेट्रोलिंग करतेवेळी हा प्रकार सायबर क्राइम पोलीसांच्या निदर्शनास आला. पोलीसांना माहिती मिळताच दोन तासांच्या आत हे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आणि ते कोणी ट्वीट केलंय याचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 24 तासांच्या आत या दोघांना हुडकुन काढलं. त्याच्यावर कलम 506 आणि 507 च्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकलमध्ये 'किकी चँलेंज' करणं पडलं महाग, साफ करावं लागलं विरार स्टेशन

राजस्थानमध्ये मुस्लिम गावांना दिली हिंदू नावं

VIDEO : अशोक चव्हाणांच्या वृत्तपत्राचे कार्यालय फोडले

 

First published: August 9, 2018, 10:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading