इथं 6 महिने आधीच हिंदू-मुस्लिम साजरा करतात दसरा, पुतळा न जाळता रावणाचा असा करतात अपमान

शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रावणाचा पुतळा जाळण्याची परंपरा आहे. मात्र एक असं गाव आहे जिथं 6 महिने अगोदर वेगळ्याच पद्धतीनं नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 11:17 AM IST

इथं 6 महिने आधीच हिंदू-मुस्लिम साजरा करतात दसरा, पुतळा न जाळता रावणाचा असा करतात अपमान

भोपाळ, 07 ऑक्टोबर : शारदीय नवरात्रौत्सव झाला की रावणाचा पुतळा जाळून विजयादशमी दसरा साजरा केला जातो. यावर्षी मंगळवारी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येईल. मात्र, मध्यप्रदेशात एक असं गाव आहे जिथं रावणाच्या मुर्तीचं नाक कापलं जातं. तेसुद्धा सहा महिने अगोदर चैत्र नवरात्रात रावणाचा अंत करण्याची परंपरा आहे. तसेच इथं हिंदुंसोबत मुस्लिम समाजही मोठ्या उत्साहानं या उत्सवात सहभागी होतो.

इंदौरपासून 190 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिकलाना गावात ही परंपरा आहे. गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती भाल्याच्या मदतीने रावणाच्या मुर्तीच्या नाकावर वार करून ते कापलं जातं. नाक कापणं म्हणजे बदनामी होणं म्हणूनच रावणाचं नाक कापण्याची परंपरा जोपासली जात आहे. वाईट प्रवृत्तींना सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून त्यांच्यातील अहंकार नष्ट कऱण्यासाठी कधी मागे राहू नये असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे.

नवरात्रोत्सवात गावातील हनुमान मंदिरातून ढोल ताशाच्या गजरात लोक निकतात. त्यानंतर राम आणि रावणाच्या सैनिकांमध्ये युद्धाचं नाटक केलं जातं. दरम्यान, हनुमानाचा वेश करणारी व्यक्ती रावणावर गदेनं प्रहार करतो. यातून प्रतिकात्मक लंका दहन दाखवण्यात येतं. परंपरेनुसार चैत्र नवरात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी रावणाच्या मुर्तीचं नाक कापून त्याचा अंत केला जातो. शारदीय नवरात्रात दसऱ्याला गावात रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जात नाही.

चिकलाना गावात जवळपास साडेतीन हजार लोक राहतात. शेजारच्या गावांपेक्षा या गावातील परंपला वेगळी आहे. रावणाचं नाक कापण्याच्या परंपरेत मुस्लिम बांधवसुद्धा सहभागी होतात. या परंपरेत आम्हीही हिरीरीने भाग घेतो असं गावचे उपसरपंच हसन खान पठाण सांगतात.

SPECIAL REPORT: रोहिणी खडसेंना शिवसेनेचा खोडा, मुक्ताईनगरमध्ये युतीला तडा?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 11:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...