मराठी बातम्या /बातम्या /देश /

भाजप प्रवेशासाठी 50 कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

भाजप प्रवेशासाठी 50 कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

पक्षनिष्ठा महत्त्वाची असल्याने आपण ही ऑफर धुडकावून लावली असंही त्यांनी सांगितलं. सिंघार हे कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते.

पक्षनिष्ठा महत्त्वाची असल्याने आपण ही ऑफर धुडकावून लावली असंही त्यांनी सांगितलं. सिंघार हे कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते.

पक्षनिष्ठा महत्त्वाची असल्याने आपण ही ऑफर धुडकावून लावली असंही त्यांनी सांगितलं. सिंघार हे कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते.

  • Published by:  Ajay Kautikwar

भोपाळ 01 नोव्हेंबर: मध्य प्रदेशमध्ये  (Madhya Pradesh) सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. पोटनिवडणुकींचा (By-Election campaign ) प्रचार आता शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 28 विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांनी एका प्रचारसभेत बोलताना भाजपवर खळबळजनक आरोप केलाय. ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती असा दावा त्यांनी केला आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडताना ज्योतिरादित्य यांनी त्यांच्यासोबत 26 आमदारांना सोबत घेतलं होतं. या सगळ्या आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळेच ही पोटनिवडणूक होत आहे. त्याच वेळी शिंदे यांनी आपल्याला ही ऑफर दिल्याचं त्यांनी सांगितलं.

मात्र पक्षनिष्ठा महत्त्वाची असल्याने आपण ही ऑफर धुडकावून लावली असंही त्यांनी सांगितलं. सिंघार हे कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते. शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेत काँग्रेसला खिंडार पाडलं होतं.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी भरसभेत काँग्रेसची घोषणा देण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोरदार भाषण केले. भाषणाच्या अखेरीस लोकांना आवाहन करताना 'काँग्रेस पक्षाच्या समोरील पंजा बटन दाबून विजयी...' असं आवाहनच केलं

पण, आपल्याकडून बोलताना चूक झाली हे लक्ष्यात येताच त्यांनी तातडीने दुरुस्ती केली आणि '3 तारखेला  भाजपच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवाराला विजयी करा' असं आवाहन करून भाषण आवरलं. पण, ज्योतिरादित्य यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पोटनिवडणूक होत आहे. 15 वर्षांनंतर 2018 मध्ये काँग्रेस सरकार आल्यानंतर कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. पण, अवघ्या 15 महिन्यांमध्ये कमलनाथ सरकार कोसळले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला  आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यांच्यासोबत 26 समर्थक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सर्वांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे मार्च महिन्यात काँग्रेस सरकार कोसळले आणि पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेत आलं. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

First published:

Tags: Madhya pradesh