मला मंत्रीपद द्या, नाही तर तुमचा कर्नाटक होईल; मुख्यमंत्र्यांना धमकी

मला मंत्रीपद द्या, नाही तर तुमचा कर्नाटक होईल; मुख्यमंत्र्यांना धमकी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना एका आमदारानेच धमकी दिली आहे.

  • Share this:

भोपाळ, 23 जानेवारी: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना एका आमदारानेच धमकी दिली आहे. बसपच्या एका आमदाराने त्यांच्याकडे मंत्रीपदाचा हट्ट धरला असून तो जर पूर्ण नाही झाला तर राज्यात कर्नाटकसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा दिला आहे.

बहुजन समाज पक्षाच्या पथरिया मतदारसंघाच्या आमदार राम बाई यांनी मंगळवारी राज्यात कर्नाटक सारखी परिस्थिती पाहायची नाही, असे वक्तव्य केले. मध्य प्रदेशमध्ये बसपाच्या प्रमुख मायावती यांच्या पाठिंब्यामुळे राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. आम्ही राज्य सरकारमध्ये बसपाच्या दोन आमदारांसाठी मंत्रीपद मागत आहोत. जर त्यांनी मला मंत्रीपद दिले नाही, तर केवळ मी नाही तर अन्य आमदार देखील नाराज होतील, असे राम बाई यांनी सांगितले.

आपण सर्वांनी कर्नाटकमध्ये काय झाले ते पाहिले आहे. सर्वांना खुश ठेवण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांना जर पक्षाला मजबूत ठेवायचे असेल, तर त्यांना प्रथम आम्हाला मजबूत करावे लागले. त्यासाठी आम्हाला मंत्रीपद दिलेच पाहिजे, असे राम बाई म्हणाल्या.

याआधी राम बाई यांनी कमलनाथ सरकारला 20 जानेवारीचा अल्टीमेटम दिला होता. त्यांनी असा दावा केला होता की, काँग्रेसने त्यांनी मंत्रीपद देण्याचे वचन दिले होते. काँग्रेसला माहीत आहे की, त्यांचे सरकार पुढील पाच वर्षे कसे चालणार आहे, असे सूचक वक्तव्य राम बाईंनी यांनी तेव्हा केले होते.

पथरियाच्या आमदार असलेल्या राम बाई सिंह या काही दिवसांपूर्वी एका पार्टीमुळे चर्चेत आल्या होत्या. बसपा प्रमुख मायावती यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत डान्स बार गर्ल बोलवल्या होत्या.

VIDEO : रुग्णालयातून सुटल्यानंतर अमित शहांचा 'मोदी अवतार'

First published: January 23, 2019, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading