दुसऱ्या लग्नात मिळाली तिसरी बायको! एकाच मंडपात पत्नी आणि मेहुणीसोबत विवाह

दुसऱ्या लग्नात मिळाली तिसरी बायको! एकाच मंडपात पत्नी आणि मेहुणीसोबत विवाह

साली आधी नव्हे ‘पूरी’ घरवाली! पत्नीसमोरच केलं मेहुणीशी लग्न.

  • Share this:

भिंड (मध्य प्रदेश), 09 डिसेंबर : ‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी एक बोलीभाषेत म्हण आहे. मात्र एकाच व्यक्तीनं तीन-तीन विवाह केल्याचे प्रकार फार कमी ऐकायला मिळतात. मात्र मध्य प्रदेशातील भिंड शहरात एक विचित्र प्रकार घडला. या लग्नात वर एक आणि वधू दोन असा अजब प्रकार पाहायला मिळाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच मंडपात एका मुलासोबत दोन बहिणींचे लग्न झाले. नवऱ्यानं आधी आपल्या पत्नीच्या बहिणीशी लग्न केले आणि त्यानंतर त्याच मंडपात पत्नीशी पुन्हा विवाह केला.

दरम्यान, या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. दिलीप असे या नवऱ्याचे नाव असून, 9 वर्षांपूर्वीच त्याचे विनीता नावाच्या महिलेशी विवाह केला होता. विनीता भिंड जिल्ह्यातील मेहगाव जिल्ह्यातील गुडावली गावची सरपंच आहे. दिलीप आणि विनीता यांना तीन अपत्ये आहेत.

वाचा-VIDEO : प्रेक्षकांनी केला जयघोष, तर भरमैदानात रवी शास्त्रींनी संजूवर उचलला हात

वाचा-सावधान! 31 डिसेंबरपासून बंद होणार 2 हजारांची नोट? जाणून घ्या काय आहे सत्य

आश्चर्याची गोष्ट म्हणजे विनीतानं स्वत: चं आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या विवाहासाठी परवानगी दिली. त्यामुळं दिलीपनं विनीता यांची बहिण रचना हिच्याशी दुसरा विवाह केला. रचना ही विनिताची चुलत बहीण आहे. दिलीपच्या दुसर्‍या लग्नाच्यावेळी हातात हार घेऊन दोन वधू उपस्थित होत्या. दिलीपनं एकाचवेळी दोन्ही वधूंच्या गळ्यात हात घालत लग्न केले.

वाचा-प्रशासनाचा असाही निषेध.. खड्ड्यात केक कापून साजरा केला वाढदिवस

वाचा-छेडछाड करणाऱ्यांना भररस्त्यातच ठेचू, विद्यार्थिनींचा एल्गार

या कारणामुळे केला दुसरा विवाह

दरम्यान दुसऱ्या विवाहाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलीप यांनी, “माझी पहिली पत्नी विनिता हिची प्रकृती ठीक नसते. आमची मुलेही लहान आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी मला पुन्हा लग्न करावे लागले”, असे सांगितले. दरम्यान पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी दिलीपचे त्यांच्या मेहुणीवर प्रेम जडले. दिलीप यांनी स्वत: आपल्या पत्नीला याबाबत सांगितले, आणि तिच्या संमतीनं मेहुणीशी विवाह केला.

First published: December 9, 2019, 1:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading