मराठी बातम्या /बातम्या /देश /

..अन् होत्याचं नव्हतं झालं! डान्स सुरू असलेली होडी पाण्यात बुडाली, पाहा थरारक VIDEO

..अन् होत्याचं नव्हतं झालं! डान्स सुरू असलेली होडी पाण्यात बुडाली, पाहा थरारक VIDEO

ही धक्कादायकI घटना घडण्यापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला अद्यापही गायब आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

खरगौन, 10 जानेवारी : आनंद साजरा केला जात असताना काळाचे फासे पलटले आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं व्हायची वेळ आली. 11 प्रवाशांनी भरलेली नाव दोन दिवसांपूर्वी नदीमध्ये उटल्याची घटना घडली होती. त्याचा धक्कादायक व्हिडीओ (VIDEO) समोर आला आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला अद्यापही गायब आहे. ही दुर्घटना घडण्याआधी महिला होडीमध्ये डान्स करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

नावघाटखेडी नर्मदा नदीत होडीनं जात असलेल्या महिलांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दुर्घटना होण्याआधी या महिला डान्स करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नाव बुडण्याआधी काहीवेळापूर्वीचा हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचा-भंडाऱ्याच्या घटनेनं 'रावळपिंडी एक्स्प्रेस' हळहळली, शोएब अख्तर म्हणाला...

ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील खरगौन जिल्ह्यातील आहे. दोन दिवसांपूर्वी नर्मदा नदीमध्ये बोट बुडाल्याची घटना घडली होती. या घटनेआधीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यात चुनरी उडवताना काही महिला बोटीमध्ये उभे राहून नाचत आहेत, दुसर्‍या बोटीवर ढोलकी वाजवत आहे आणि तिसर्‍या बोटीवर भाविकांनी चुनरी धरली आहे. होडीमध्ये डान्स केल्यानं त्याचं संतुलन बिघडलं आणि ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. होडी उलटल्यानं 11 भाविक नदीत बुडाले. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला तर एक अद्यापही गायब असल्याचं सांगितलं जात आहे. 9 महिलांना वाचवण्यात यश आलं आहे.

First published:

Tags: Madhya pradesh