भोपाळ, 07 जुलै : तुमचा हात, चेहरा पाहून तुमची कुंडली सांगणारे ज्योतिषी तुम्हाला बरेच माहिती असतील. पण सध्या अशी एक चिमुकली चर्चेत आली आहे जी न पाहतात फक्त मोबाईलला स्पर्श करून मोबाईलमधील फोटोची कुंडली सांगते. तसं डोळे बंद करून एखाद्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करूनही व्यक्ती ओळखणं कठीण असतं
(Talented kids). असं असताना फक्त मोबाईलमधील फोटोला स्पर्श करून व्यक्ती ओळखणं आणि त्याची कुंडली सांगणं म्हणजे जादूच नाही का? ही अनोखी जादू म्हणा किंवा टॅलेंट म्हणा ते आहे मध्य प्रदेशच्या आकाशी व्यासकडे
(Akashi Vyas).
टिकमगढमध्ये राहणारी आकाशी व्यास दहावीची विद्यार्थीनी आहे. डोळे बंद करून मोबाईलला स्पर्श करत ती मोबाईलमधील फोटोची संपूर्ण माहिती देते. फोटो कुणाचा आहे, त्याने काय कपडे घातले आहेत, ती व्यक्ती काय करते, तिचं व्यक्तिमत्व कसं आहे इतकंच नव्हे तर ती व्यक्ती हयात आहे की तिचा मृत्यू झाला आहे, हेसुद्धा ती सांगते. शिवाय तो फोटो किती जुना आहे, फोटो कधी काढला आहे, फोटोची तारीख आणि वेळही ती अचूक सांगते.
हे वाचा - बाबो! रेकॉर्डच्या नादात तरुणीने फक्त 8 मिनिटांत फस्त केलं आठवडाभराचं खाणं; चॅलेंजचा शेवट काय झाला पाहा VIDEO
न्यूज 18 ने आकाशीमध्ये असं टॅलेंट खरंच आहे का याची पडताळणीही केली. न्यूज 18 ची टीम तिच्या घरी गेली. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून डोळे बंद करण्यात आले. त्यानंतर मोबाईलमधील जुने फोटो काढून आकाशीला ओळखण्यास सांगण्यात आले.
आकाशीला सुरुवातीला स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा फोटो देण्यात आला. आकाशीने मोबाईल हातात धरून त्यांचे कपडे, त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत सांगितलं. तसंच त्यांचा मृत्यू बॉम्बस्फोटात झाल्याचंही ती म्हणाली. त्यानंतर तिला महात्मा गांधींचा फोटो देण्यात आला. त्यावेळी तिने हा फोटो दुसऱ्या फोटोवरून घेण्यात आला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट असून यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला असं सांगितलं. त्यानंतर तिने हे महात्मा गांधी असल्याचंही सांगितलं.
हे वाचा - बापरे! शेकडो फूट उंचावर चिमुकलीचा Dangerous Stunt; काळजाचा ठोका चुकवणारा Video
आकाशीचं हे टॅलेंट जादूपेक्षाही भारी आहे. तिच्या या टॅलेंटला नेमकं काय म्हणावं तेच समजेना. तिचं हे टॅलेंट खरंच हैराण करणारं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.