भोपाळ, 08 जानेवारी : मातीशी नाळ जोडलेले आणि कितीही मोठ्या पदावर असले तरी पुन्हा मातीसोबत आणि तिथल्या माणसांसोबत मिसळणारे राजकीय नेते खूप कमी पाहायला मिळतात. भाजप खासदारानं माती आणि जोडलेलं नातं निभावतानाचा एक भावुक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे त्यांची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
भाजप खासदार डॉ. सुमेर सिंह सोलंकी यांनी नुकताच एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोचं कॅप्शन त्यांनी खूप सुंदर दिलं आहे. 'मी माझ्या वडिलांसोबत... माझ्या मुलाला मोटार वेडिंगच्या कामाबाबत माहिती देत आहे'. या फोटोमध्ये तीन पिढ्या म्हणजेच भाजप खासदार सोलंकी स्वत: त्यांचे वडील आणि त्यांचा मुलगा असे एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत. त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेलं ज्ञान, कौशल्य आणि मातीसोबत जोडण्याचं तंत्र आता ते मुलाला शिकवत आहेत.
मैं अपने बाबा के साथ....। खेत पर मोटर वेडिंग करने के पुराने कार्य से मेरे बेटे उज्जवल को अवगत कराया। जय श्री राम। pic.twitter.com/c3BXxBlbeL
— Dr. Sumer Singh Solanki (@DrSumerSolanki1) January 6, 2021
जय श्री राम जय श्री राम आदरणीय सांसद साहब के इस कार्य को देख कर मन में जोश और उत्साह है और अपने गांव की याद आ गई और इससे युवा वर्ग को हमेशा हमेशा एक आदर्श सीखने को मिलेगा जय श्री राम
— Mohan Yadav (@MohanYa99450784) January 8, 2021
डॉ. सुमेर सोलंकी हे मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांना खासदारकीचं तिकीट देण्याआधी डॉ. सोलंकी हे प्राध्यापक म्हणून काम करत होते. शिक्षण आणि त्याशिवाय गावात वेगवेगळ्या मोहिमा राबवण्यावर त्यांचा पुढाकार होता. काही महिन्यांपूर्वी ते प्राध्यापक म्हणून काम करत असताना अचानक त्यांना भाजपने त्यांची मातीशी असणारी नाळ पाहून तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याच्या माहितीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या. प्रत्यक्षात सोलंकी यांना राज्यसभेचं तिकीट देऊन आश्चर्यचकीत केलं. डॉ. सुमेर सोलंकी यांना ज्यावेळी खासदारीचं तिकीट मिळाल्याची माहिती मिळाली त्यावेळी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ते शिकवत होते.
कायमच ते त्यांच्या कामाशी आणि जमिनीशी जोडलेले असल्यानं त्यांचं कौतुक होत राहात. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोमुळे तर पुन्हा एकदा खासदार सोलंकी चर्चेत आले आहेत. या फोटोमध्ये खासदार सोलंकी त्यांचे वडील आणि त्यांचा मुलगा असे तिन्ही पिढ्या एकाच फोटोमध्ये दिसल्या आहे. अनेक युझर्सनी त्यांच्या याच साधेपणाचं आणि लोकांसोबत जोडलेल्या नात्यामुळे त्यांचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Madhya pradesh