भाजप मंत्र्याला आवरला नाही मोह! गाडी थांबवून गूळ तयार करण्यात झाले सहभागी, पाहा VIDEO

गुळाच्या केंद्रावर भाजपच्या मंत्र्यांनी भेट देऊन तिथल्या लोकांसोबत चर्चा केली आहे.

गुळाच्या केंद्रावर भाजपच्या मंत्र्यांनी भेट देऊन तिथल्या लोकांसोबत चर्चा केली आहे.

  • Share this:
    नरसिंहपूर, 27 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी तेलंगणाच्या एका मंत्र्याचा फुगे फोडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर काल महाराष्ट्रातील वनमंत्र्यांचा कौटुंबिक सोहळ्यात डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आता भाजपच्या एका मंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कामानिमित्तानं जात असताना अचानक वाटेल गूळ केंद्र लागलं आणि तिथे भाजपच्या मंत्र्यांची पावलं थांबली. त्यांनी गाडीतून उतरून थेट केंद्र गाठलं आणि गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-झोपेत असताना मंदिरात लागली आग, बाहेर पळाले पण गेटवरच मृत्यूने गाठले मध्य प्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल कामासाठी निघाले असताना त्यांना गूळ केंद्रावर गूळ तयार करत असल्याचा वास आला त्या सुगंधानं मोह आवरला नाही म्हणून त्यांनी नरसिंहपूर इथे गाडी थांबवण्याच्या सूचना दिल्या आणि स्वत: गूळ केंद्रावर भेट दिली. तिथे त्यांनी गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेत देखील सहभाग घेतला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नरसिंगपूर येथील शेतकरी गुळाच्या भट्टी येथे मंत्री कमल पटेल यांनी सेंद्रिय गुळासह सेंद्रिय पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून गूळ बनवण्याच्या तंत्राची सविस्तर माहिती मिळविली. व्हिडीओमध्ये, मंत्री कमल पटेल हे गुळाने भरलेल्या पातेल्यामध्ये गुळाचं रसायन ढवळताना पाहायला मिळत आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: