धक्कादायक ! पाण्यासाठी कुटुंबीयांनी सुनेला जिवंत जाळलं, 6 जण फरार

पाणी संघर्षावरून लोक अक्षरशः एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. यादरम्यानच पाण्यावरून एका कुटुंबात इतकं मोठं भांडण झालं की संपूर्ण कुटुंबीयांनी मिळून आपल्याच घरातील सूनेला जिवंत जाळलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 07:25 PM IST

धक्कादायक ! पाण्यासाठी कुटुंबीयांनी सुनेला जिवंत जाळलं, 6 जण फरार

भोपाळ, 18 जुलै : देशभरात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. पाणी संघर्षावरून लोक अक्षरशः एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. यादरम्यानच पाण्यावरून एका कुटुंबात इतकं मोठं भांडण झालं की संपूर्ण कुटुंबीयांनी मिळून आपल्याच घरातील सूनेला जिवंत जाळलं. यामध्ये पीडित महिला 90 टक्के भाजली आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सासू-सासऱ्यासहीत 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी सध्या फरार आहेत. अंगावर काटा आणणारी ही घटना मध्य प्रदेशातील बैतुल येथे घडली आहे.

(पाहा :VIDEO : कंत्राटी शिक्षकांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज)

हँडपंपवरून झाला वाद

बैतुलमधील बडोरा गावातील रहिवासी असलेल्या साहू परिवारात गेल्या काही दिवसांपासून वादविवाद सुरू होते. कुटुंबीयांतील सदस्यांमध्ये जमिनींची विभागणी करण्यात आली होती. यानुसार कुटुंबातील राजेश नावाच्या व्यक्तीला मिळालेल्या जमिनीवर सेप्टिक टँक होता, तर दुसऱ्या सदस्यांना मिळालेल्या जमिनीवर हँडपंप होता. याच हँडपंपमधून पाणी घेण्यावरून नियमित भांडणं होत असतं. ज्यांच्या वाट्याला हा हँडपंप असणारी जमीन आली होती, ती मंडळी राजेश आणि त्याच्या पत्नीला पाणी घेण्यास मज्जाव करायचे. गुरुवारी (18 जुलाई )सकाळी राजेशच्या कुटुंबीयांनी पाण्यावरून त्याची पत्नी द्वारकासोबत जोरदार वाद झाला आणि त्यानंतर या सर्वांनी मिळून अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळलं.

(पाहा :VIDEO: लष्करी अळीमुळे बळीराजा हवालदिल; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर)

Loading...

6 जणांविरोधात गुन्हा दाखल

द्वारकाला जिवंत जाळल्यानंतर तिनं वाचवण्यासाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून राजेश आणि त्याची मुलगी घराबाहेर धावले. द्वारकाला जिवंत जळताना पाहून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. राजेशनं पत्नी द्वारकाला कसंबसं यातून वाचवलं आणि तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. द्वारकेनं दिलेल्या जबाबानुसार सासू-सासरे, राजेशचा भाऊ, त्याची पत्नी आणि चुलत सासू-सासरे यांच्यासहीत 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार रामवती साहू, नारायण साहू, भाग्या साहू, ललिता साहू आणि बाली साहू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. या सर्वांवर द्वारकेला जिवंत जाळल्याचा आरोप आहे.

(पाहा :VIDEO: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन)

औरंगाबादेत MIM नगरसेवकांनी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात खाल्ले डबे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...