धक्कादायक : शाळेतल्या मैत्रिणीला घरी बोलावून मित्राने केला बलात्कार

धक्कादायक : शाळेतल्या मैत्रिणीला घरी बोलावून मित्राने केला बलात्कार

त्याने तिच्यासाठी चहा केला आणि त्यातून तिला गुंगीचं औषध दिलं. तिला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

  • Share this:

भोपाळ 25 जून : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं घडलेल्या एका घटनेनं सगळ्यांना धक्का बसलाय. बालपणीच्या मैत्रिणीला घरी बोलावून तिच्यावर एका नराधमाने बलात्कार केला. पीडीत महिला विवाहीत आहे. चहामध्ये गुंगीचं औषध देऊन त्याने हे कृत्य केलं. त्याचा व्हिडीओ बनवून तो तिला ब्लॅकमेलही करत असे. शेवटी महिला पोलिसांमध्ये गेली आणि आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मनोज भम्भरकर असं त्या वकृत आरोपीचं नाव आहे.

37 वर्षीय पीडीत महिला ही भोपाळला राहणारी आहे. दोन वर्षांपूर्वी शाळेतल्या मनोज या मित्राची तिला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. जुन्या मित्रांची भेट झाल्याने तिलाही आनंद झाला आणि ते फेसबुकवर पुन्हा एकमेकांशी जोडले गेले. शाळेतल्या आठवणी, जुने दिवस, त्याकाळचे मित्र मैत्रिणी अशा त्यांच्या फेसबुकवरून गप्पा होत होत्या. हळुहळू मैत्री वाढत गेली.

नंतर एक दिवस मनोजने तिला आपल्या घरी बोलवलं. तोही भोपाळमध्येच राहात असल्याने ती त्यांच्या घरी गेली. त्यावेळी तो घरात एकटाच होता. गप्पा टप्पा झाल्यावर त्याने तिच्यासाठी चहा केला आणि त्यातून तिला गुंगीचं औषध दिलं. तिला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढच करून तो थांबला नाही तर त्याचा त्याने व्हिडीओही बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला ब्लॅकमेल करू लागला.

मनोजचा त्रास वाढल्याने तिने ही घटना आपल्या नवऱ्याला सांगितली. नंतर दोघांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली. मनोज सध्या त्याच्या घरी नसून तो पळून गेला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 03:30 PM IST

ताज्या बातम्या