साध्वी प्रज्ञा सिंगांना उमेदवारी देण्यावरून रामदास आठवले भाजपवर नाराज

साध्वी प्रज्ञा यांनी शहीदांचा अपमान केला आहे. त्या ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत त्यामुळे भाजप अडचणीत येऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2019 10:41 PM IST

साध्वी प्रज्ञा सिंगांना उमेदवारी देण्यावरून रामदास आठवले भाजपवर नाराज

भोपाळ 29 एप्रिल : साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवरी द्यायला नको होती असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. साध्वी या मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातल्या आरोपी आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत येऊ शकतो असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

रामदास आठवले हे भोपाळच्या दौऱ्यावर आले होते. ते म्हणाले, कुणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा प्रश्न असला तरी साध्वींना उमेदवारी द्यायला नको होती. त्यांनी शहीदांचा अपमान केला आहे. त्या ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत त्यामुळे भाजप अडचणीत येऊ शकतो. भाजपने त्यांना आवर घातला पाहिजे असं मतही आठवले यांनी व्यक्त केलं. नवं सरकार आल्यानंतर प्रमोशन देतानाही 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा कायदा करण्यासाठी आग्रही राहू असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

 दिग्विजय सिंग यांच्या मदतीला कन्हैय्या

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे भोपाळचे उमेदवार दिग्विजय सिंग यांच्या प्रचारासाठी कन्हैय्या कुमार भोपाळमध्ये येणार आहे. खुद्द सिंग यांनीच ही माहिती दिली. दिग्विजय सिंग म्हणाले, मी कन्हैय्याचा समर्थक आहे. तो प्रचारासाठी येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. तर कन्हैय्या कुमार हा देशद्रोही असल्याचं सांगत भाजप त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही बोललं जातंय.

दिग्विजय सिंग म्हणाले, कन्हैय्या हा देशद्रोही नाही. त्याने भारताविरोधात घोषणाबाजी केली नाही. त्याला त्या आरोपांमध्ये गोवण्यात आलं आहे. कन्हैय्या हा बिहारमधल्या बेगुसराय मधून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. भारतीय कम्युनिष्ट पक्षाने त्याला उमेदवारी दिलीय. बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसची आघाडी असून ही जागा राजदच्या वाट्याला गेली आहे. त्या जागेवर राजदने उमेदवार उभा करू नये अशी मागणी केली जात होती. मात्र राजदने तिथे आपला उमेदवार दिला.

Loading...

सिंग म्हणाले, मी काँग्रेस श्रेष्ठींशी याबाबत बोललो होतो. मात्र राजदने ती विनंती मान्य केली नाही. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे कन्हैय्या कुमारच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तर भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर या दिग्विजय सिंग यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

भोपाळमध्ये मुस्लिम मतदारांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा कट्टर विरोधक म्हणून कन्हैय्या कुमारचा उपयोग होऊ शकेल असा दिग्विजय सिंग यांचा अंदाज असल्याचं बोललं जातंय.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 10:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...