भोपाळ 22 जानेवारी : मध्य प्रदेशमध्ये मंगळवारची सकाळ उजाडली ती एका राजकीय बातमीने सोमवारी मध्यरात्री काँग्रेसचे नेते जोतिरादित्य शिंदे आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट झाली. या दोन नेत्यांच्या मुलाखतीने लोकांना जसं आश्चर्याचा धक्का दिला तसच त्या भेटीत नेमकं काय झालं याची उत्सुकता निर्माण झालीय.
मध्य प्रदेश मधल्या विधानसभा निवडणुकीत शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. आक्षेप घेतले होते. त्यानंतर काँग्रेसला विजय मिळाला आणि 15 वर्षांची चौहानांची राजवट बदलली. आता निवडणूक संपून बरेच दिवस झाल्याने राजकीय वातावरणही शांत झालंय. त्यामुळे हे दोन नेते भेटले आणि भरभरून गप्पाही मारल्या.
सोमवारी रात्री ज्योतिरादित्य शिवराजसिंह चौहानांच्या निवासस्थानी गेले. सुरुवातीला याचा कुणालाच पत्ता नव्हता. नंतर याची माहिती कळताच पत्रकार त्यांच्या घराबाहेर गोळा झाले. या दोन नेत्यांची ही भेट जवळपास दोन अडीच तास चालली.
शिवराजसिंह हे ज्योतिरादित्य यांना सोडण्यासाठी त्यांच्या गाडीपर्यंत गेले. शेवटी पत्रकारांनी त्यांना गाठून बैठकीत काय झालं अशी विचारणा केली. निडणूक संपली आणि वादही संपले, झालं गेलं विसरुन गेलं पाहिजे. शिवराजजी हे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांना भेटलो असं शिंदे म्हणाले तर माझ्या मनात कुठलीही कटुता नाही. आम्ही मनमोकळ्या गप्पा केल्या असं चौहान यांनी सांगितलं.
आम्ही फक्त गप्पा करण्यासाठी भेटलो असं या नेत्यांनी स्पष्ट केलं तरी मध्य प्रदेशच्या राजकीय पटलावर याची चर्चा अनेक दिवस चालणार आहे.
VIDEO : रुग्णालयातून सुटल्यानंतर अमित शहांचा 'मोदी अवतार'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jyotiraditya scindia, Shivraj singh chauhans, ज्योतिरादित्य शिंदे, शिवराजसिं चौहान