भोपाळ, 21 नोव्हेंबर : देशात एकीकडे रामाच्या नावावरून आणि जागेवरून वाद सुरू आहे तर दुसरीकडे एकीचा संदेश देणारी एक बातमी आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात अशी व्यक्ती आहे जी लोकांना रामच्या नावाने जोडण्याचे काम करते. फारुख खान असे त्यांचं नाव असून ते रामायणावर लोकांना प्रवचन देतात. त्यांच्या या खास आणि आदर्श अशा शैलीमुळे लोक त्यांना 'फारुख रामायणी' म्हणून संबोधतात. तो अशा जातीय सलोख्याचा चेहरा आहे ज्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला भारत देश दिसतो.
आश्चर्य म्हणजे राजगड जिल्ह्यातील नरसिंगगडमध्ये राहणारे फारुख रामायणी गेल्या 35 वर्षांपासून संगीतमय रामकथा करतातय आत्तापर्यंत त्यांनी देशातील विविध ठिकाणी 300पेक्षा जास्त रामकथा सांगितल्या आहेत. देशात रामावरून राजकारण सुरू असताना फारूख यांची कामगिरी आदर्श आहे.
फारुख रामायणी यांनी सांगितले की,...
रोज पाचवेळा नामाज पडणारे फारूख म्हणतात की, राम आपल्या श्वासात आहे. रामाच्या नावाखाली ते लोकांना एकत्र आणण्याचं सगळ्यात पवित्र काम करतात. यातून त्यांना आर्थिक मदतही होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फारूक जिथे रामकथा करतात तिथे शेकडो लोक दररोज त्यांच्या रामकथांचा आनंद घेतात. लोकांना एकत्र आणणं हाच माझा राम आहे असंही फारूख म्हणतात.
खरंतर, फारूख हे मुस्लिम आहेत. ते रोज 5 वेळा नमाज पडतात. त्यांना धार्मिक पुस्तकं वाचण्याचा छंद आहे. रामायणाच्या आवडीबरोबरच त्यांना संस्कृत वाचण्याची आवड असल्याचंही सांगण्यात येतं. खरंतर आताच्या जगात अशा गोष्टींकडे तरुणांचं दुर्लक्ष झालं आहे. पण अशात फारूख यांच्या अशा कामगिरीमुळे लहान मुलांवर चांगले संस्कार होतात अशी पालकांची प्रतिक्रिया आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा