मराठी बातम्या /बातम्या /देश /

घरात कोळ्याचं जाळं जरी काढलं तर पती करायचा मारहाण, पत्नीची कोर्टात धाव

घरात कोळ्याचं जाळं जरी काढलं तर पती करायचा मारहाण, पत्नीची कोर्टात धाव

या प्रकरणामध्ये 'नवरा (Husband) आपला विचित्र पद्धतीनं छळ करतो, आपल्यावर संशय घेतो आणि जनावरासारखी मारहाण करतो' अशी तक्रार पीडित पत्नीनं (Wife) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

भोपाळ, 4 फेब्रुवारी : आपल्या गैरहजेरीत घरामध्ये कुणी पुरुष आला आहे का? हे पाहण्यासाठी नवऱ्यानं घरात कोळ्याचं जाळं (Spider Web) वाढवलं आहे, हे तुम्ही कधी ऐकलं आहे का?  ऐकण्यास कितीही विचित्र वाटत असलं तरी ही गोष्ट खरी आहे. या प्रकरणातील नवरा घरी येताच घरातील सर्व खोल्या, भिंती आणि कोपऱ्यांची एखाद्या हेरासारखी तपासणी करतो आणि कोळ्याचं जाळं थोडं जरी बदललेलं दिसलं तर बायकोला मारहाण करतो... ही गोष्ट अगदी फिल्मी वाटत असली तरी संपूर्ण खरी आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमधील (Bhopal) कुटुंब न्यायालयात (Family Court) सध्या एक असंच विचित्र प्रकरण आलं आहे. या प्रकरणामध्ये 'नवरा (Husband) आपला विचित्र पद्धतीनं छळ करतो, आपल्यावर संशय घेतो आणि जनावरासारखी मारहाण करतो' अशी तक्रार पीडित पत्नीनं (Wife) केली आहे.

भोपाळच्या कुटंब न्यायालयातील कौन्सिलर सरिता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा नवरा एका खासगी कंपनीत टेक्निकल ऑफिसर आहे. त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली आहेत. त्यांना एक 12 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांचा मुलगा आहे.

तोडग्याची शक्यता नाही

पीडित महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार, नवऱ्यानं घरात पुरुषांना संपूर्ण प्रवेशबंदी केली आहे. एखादा पुरुष नातेवाईक चुकून घरी आलाच तर नवरा त्यांना मारहाण करु लागतो. चार महिन्यांपूर्वी त्यांचा एक पुरुष नातेवाईक दुपारी घरी आला होता. तो घरी आल्याचं नवऱ्याला घरातील आणि मोबाईलमधील CCTV कॅमेऱ्याच्या साह्यानं समजलं. त्यानंतर त्यानं पीडित महिलेला जबरदस्त मारहाण केली. या प्रकरानंतर पीडित महिलेनं नवऱ्याचं घर सोडलं असून त्या सध्या माहेरी राहत आहेत.

या दोघांचं लग्न कायम राहावं यासाठी कुटुंब न्यायालय प्रयत्न करत आहे, मात्र या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता अगदी कमी आहे. या जोडप्याचा घटस्फोट होणार हे जवळपास नक्की आहे.

First published:

Tags: Crime, Madhya pradesh