बायकोच्या तक्रारीमुळे नवऱ्याला 15 वेळा जेल, दोघांनी 11 वर्षांनी पुन्हा केलं लग्न

बायकोच्या तक्रारीमुळे नवऱ्याला 15 वेळा जेल, दोघांनी 11 वर्षांनी पुन्हा केलं लग्न

बायकोच्या तक्रारीमुळे नवऱ्याला 15 वेळा जेल जावं लागलं असेल तर ते जोडपं पुन्हा एकत्र नांदण्याची शक्यता नसते. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल जिल्हा कोर्टात एक असाच अजब प्रसंग घडला. तब्बल 11 वर्ष वेगळं राहिलेल्या जोडप्यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या.

  • Share this:

बैतूल, (मध्य प्रदेश) 13 डिसेंबर :  लग्नानंतर नवरा-बायकोंमधील भांडणं ही परिस्थितीमुळे, घरच्यांच्या मध्यस्थीनं किंवा मुलाकडं पाहून अनेकदा मिटतात. घटस्फोटासाठी दाखल केलेली केस देखील कौन्सलिंगच्यामार्फत सोडवण्याचा कोर्टाचा सुरुवातीला प्रयत्न असतो. मात्र बायकोच्या तक्रारीमुळे नवऱ्याला 15 वेळा जेल जावं लागलं असेल तर ते जोडपं पुन्हा एकत्र नांदण्याची शक्यता नसते. जेलवारीला कारणीभूत ठरलेल्या बायकोसोबत पुन्हा राहण्यास तयार होण्याची नवऱ्याचं उदाहरण अगदीच क्वचित असेल.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल जिल्हा कोर्टात एक असाच अजब प्रसंग घडला. तब्बल 11 वर्ष वेगळं राहिलेल्या जोडप्यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या आणि ते परस्परांसोबत नांदायला तयार झाले. ममता आणि चंद्रशेखर साहू असे या जोडप्याचं नाव आहे. ममताने चंद्रशेखरच्या विरुद्ध 2009 साली घरगुती छळ आणि हुड्यांची मागणी या दोन आरोपांखाली केस दाखल केली होती. या प्रकरणात गेल्या 11 वर्षात 15 वेळा चंद्रशेखरला जेलमध्ये जावं लागलं आहे. या काळात पोलीसांनी सातत्यानं अटक वॉरंट काढल्यानं चंद्रशेखरला वारंवार जेलची वारी करावी लागली. बायकोसोबतचं भांडण मिटाल्यानं जेलच्या चक्रातून सुटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

हे वाचा-'हे भारत माते मला माफ कर', छेडछाडीला कंटाळून 17 वर्षीय मुलीची आत्महत्या

मुलामुळे मिटले भांडण

चंद्रशेखर आणि ममतामधील हे कट्टर भांडण मिटण्याचं कारण त्यांचा मुलगा ठरला. त्यांच्या मुलाला टीबीचा आजार झाला आहे. मुलाच्या आजारापणाबद्दल समजल्यानंतर चंद्रशेखरला वाईट वाटले. त्यानंतर त्यांनी भांडण मिटवण्यासाठी वकिलांची मदत घेतली. वकिलांनी दोन्ही नवरा-बायकोंची समजूत घातल्यानंतर ते एकमेकांसोबत राहण्यासाठी तयार झाले.

“माझ्या बायकोनं केलेली तक्रार हा भूतकाळ होता. आता आम्हाला मुलाच्या भविष्याचा विचार करायचा आहे, ’’ अशी भावना चंद्रशेखरनं कोर्टात व्यक्त केली. तर, “इतक्या वर्षांनतर या दोघांना नात्याचं महत्त्व समजलं, मुलाच्या भविष्यासाठी ते एकत्र येण्यास तयार झाले ही मोठी गोष्ट आहे ”, असं मत या प्रकरणात मध्यस्थी करणारे वकील अजय चौहान यांनी व्यक्त केले आहे.

Published by: News18 Desk
First published: December 13, 2020, 2:14 PM IST

ताज्या बातम्या