मध्यप्रदेशच्या निवडणूक प्रचारात 'गब्बर सिंग'ची एन्ट्री

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2018 04:01 PM IST

मध्यप्रदेशच्या निवडणूक प्रचारात 'गब्बर सिंग'ची एन्ट्री

भोपाल, ता. 30 ऑगस्ट : मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र प्रचाराला सर्व पक्षांनी सुरूवात केलीय. येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जास्तित जास्त मतदारांनी नाव नोंदणी करावी यासाठी निवडणूक आयोगानेही विविध उपक्रम राबवण्याला सुरूवात केलीय. याचाच एक भाग म्हणून खंडवा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी चक्क 'शोले'मधल्या गब्बर सिंगचा आधार घेतलाय. 'शोले'तल्या गब्बर सिंगचा फोटो पोस्टरवर घेत त्याच्या खास अंदाजात, अरे ओ साम्भा कब है व्होटिंग? असा प्रश्न विचारण्यात आलाय.

कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा असा संदेशही या पोस्टरमधून देण्यात आलाय. निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या जागृतीसाठी मोहिम राबविण्यात येत असते. नागरिकांनी मतदार यादीत आपलं नाव आहे का? नसेल तर त्यासाठी नाव नोंदणी करणं, असेल तर ते योग्य मतदान केंद्राच्या यादीत आहे का? हे तापसणं गरजेचं आहे.

तस झालं तरच मतदान यादी योग्य प्रकारे तयार होते. पण नागरिक या कामासाठी फारसे उत्सुक नसतात. त्यामुळं ऐन मतदानाच्या दिवशी अनेक जण मतदानापासून वंचित राहतात किंवा त्यांची नावं मतदार यादीतून गायब होतात आणि गोंधळ उडतो.

हे टाळण्यासाठी वेळीच काळजी घेतली तर मतदानापासून वंचित व्हावं लागत नाही. खंडवा निवडणूक अधिकाऱ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं नागरिकांनी कौतुक केलं असून सोशल मीडियावरही त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.

VIDEO : शिवराज सिंग 'बाहुबली' तर ज्योतिरादित्य 'भल्लादेव'

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 04:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...