मध्य प्रदेश LIVE : सस्पेन्स संपला, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष; भाजपच्या गडाला भगदाड

मध्य प्रदेश LIVE : सस्पेन्स संपला, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष; भाजपच्या गडाला भगदाड

मध्य प्रदेश हा वर्षानुवर्ष भाजपचा गड राहिला आहे. पण आता काँग्रेसने हे राज्य हिसकावून घेत भाजपला चांगलाच दणका दिला आहे.

  • Share this:

भोपाळ, 12 डिसेंबर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाचा सस्पेन्स अखेर 24 तासानंतर संपला आहे. या निवडणुकीत 114 जागा मिळवत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला 109 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इतरांच्या खात्यात 7 जागा गेल्या.

मध्य प्रदेश हा वर्षानुवर्ष भाजपचा गड राहिला आहे. पण आता काँग्रेसने हे राज्य हिसकावून घेत भाजपला चांगलाच दणका दिला आहे. भाजप सरकाविरोधातील रोष आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिकाटीने केलेला प्रचार हे या सत्ताबदलामागील मुख्य कारण आहे.

काँग्रेसकडून सत्तास्थापणेचा दावा

एकूण 230 जागा असणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभेच्या बहुमतासाठी 116 जागा आवश्यक आहेत. काँग्रेस या जादुई आकड्यापासून अवघ्या 2 जागा दूर राहिली आहे. पण मित्रपक्ष आणि अपक्षांचाही आम्हाला पाठिंबा आहे, असं म्हणत काँग्रेसने सत्तास्थापणेचा दावा केला आहे. याबाबात मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी सत्ता स्थापणेचा दावा करत राज्यपालांना भेटीची वेळही मागितली आहे.

शिवराज सरकारचा का झाला पराभव? टॉप 5 कारणे

1. मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहे. त्यामुळं लोकांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागला. राज्य सरकारचा प्रशासनावर धाक राहिला नव्हता. लोकांची कामं होत नव्हती त्यामुळे लोकांनी सरकार विरोधात मतदान केलं.

2. भ्रष्टाचारामुळे लोक नाराज होते. नेते आणि अधिकाऱ्यांचे हितसंबध निर्माण झाल्याने खालपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला होता. लोक भ्रष्टाचाराला कंटाळले होते. त्यामुळं त्यांनी सत्ता परिवर्तनाला पसंती दिली.

3. नोटबंदी आणि त्यानंतरच्या जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना फटका बसला. हाच मध्यमवर्ग हा भाजपचा मतदार आहे. त्यामुळं या जाचक कायद्यांविरोधात लोकांनी आपला रोष व्यक्त केला.

4. अपुरा पाऊस आणि अनेक भागात दुष्काळाची स्थिती होती. शेतीमालाला पुरेसा भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आंदोलनं झालीत. सरकारनं शेतकऱ्यांच्या दु:खाची दखल योग्य पद्धतीने घेतली नव्हती.

5. शिवराज सिंग यांची वैयक्तिक प्रतिमा चांगली असली तरी आता भाजपचं सरकार नको अशी जनतेची भावना होती. आमदार आणि स्थानिक नेत्यांचा अहंकार आणि सत्तेच्या गुर्मीमुळे लोकांनी त्यांना नाकारलं.

VIDEO: काँग्रेसचा वनवास संपला, महाराष्ट्रातही सुरू झालं जंगी सेलिब्रेशन

First published: December 12, 2018, 7:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading