Home /News /national /

44 लाखांचा सरपंच..! सरपंचपदाच्या खुर्चीसाठी झाला लिलाव, बोलीनंतर सरपंचाची निवड

44 लाखांचा सरपंच..! सरपंचपदाच्या खुर्चीसाठी झाला लिलाव, बोलीनंतर सरपंचाची निवड

या लिलाव प्रक्रियेत गावातील चार जण सहभागी झाले होते. ही रक्कम आता गावातील मंदिरासाठी (Temple) वापरली जाणार आहे.

  मध्य प्रदेश, 16 डिसेंबर:  मध्य प्रदेशात ( Madhya Pradesh ) एका गावात सरपंचपदाचा लिलाव ( auction ) झाला. गावातील प्रतिष्ठेच्या या पदासाठी एकाने तब्बल 44 लाख रुपये मोजत सरपंचपद ( Sarpanch ) मिळवलं. या लिलाव प्रक्रियेत गावातील चार जण सहभागी झाले होते. ही रक्कम आता गावातील मंदिरासाठी (Temple) वापरली जाणार आहे. दैनिक भास्कर ने याबाबत वृत्त दिलं आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मध्य प्रदेशात ग्रामपंचायत निवडणुकीचा ( Gram Panchayat elections ) बार उडालाय. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या अनेकदा बिनविरोध निवडणुका सर्रास पार पडतात. मात्र, मध्य प्रदेशातील अशोक नगर जिल्ह्यातील भटोली गावात ( Bhatoli village ) एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. इथं सरपंचपदाचा लिलाव करण्यात आला. यात ज्याने सर्वाधिक बोली लावली, तोच आता पुढचा सरपंच होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अशाप्रकारे सरपंच निवड नियमाविरुद्ध असल्याचे सांगत काही जणांनी चौकशीची मागणी केली आहे. हेही वाचा-  Gangrape Case: चुलत भावानीच अल्पवयीन बहिणीला दिल्या नरकयातना, प्रसूतीवेळी पीडितेचा मृत्यू
   लिलाव करून सरपंच निवडणे, याचा निवडणुकीच्या कायदेशीर प्रक्रियेशी थेट संबंध नसल्याचे निवडणूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जो कोणी निवडणूक लढवेल, त्याला उमेदवारी अर्ज भरावा लागेल. सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आला आणि तो वैध ठरला, तरच तो सरपंच बिनविरोध निवडला जाईल. तो कोणीही असू शकतो, अगदी बोली लावणाराही, असेही त्यांचे मत आहे. दुसरीकडे ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2009 च्या निवडणुकीत अशाच पद्धतीने सरपंच निवडून आला होता. त्यावेळी ही रक्कम पाच लाख रुपये होती. ही रक्कम गावाच्या विकासासाठी वापरली जाते.
  मंदिराच्या जीर्णोद्धाराला प्राधान्य सरपंचपदाचा लिलाव मंगळवारी गावातील राधाकृष्ण मंदिर परिसरात झाला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत येथे बैठक झाली. सरपंच निवडीसाठी दोन गोष्टी आवश्यक होत्या. एका गावाचा विकास आणि दुसऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार. या अटीवर सरपंचपदाचा लिलाव सुरू झाला, यामध्ये चार जणांनी भाग घेतला. मंदिरात बोलीदारांनी सर्वात प्रथम 5 हजार रुपये ठेवले. यानंतर प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली. सर्वात प्रथम 21 लाख रुपयांची बोली लावण्यात आली.जेव्हा बोली 43 लाख रुपयांवर पोहोचली, तेव्हा सौभाग सिंग यादवने 44 लाख रुपयांची बोली लावली. ही बोली सर्वात जास्त ठरल्याने यादव यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करीत असल्याचे गावकऱ्यांनी जाहीर केले. आता यादव यांच्या विरोधात कोणीही निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सरपंचपदासाठी सर्वात जास्त बोली लावणारे यादव म्हणाले, 'मंदिरासाठी पैसे गोळा करतानाच सरपंच निवडला जावा, ही गावकऱ्यांची इच्छा होती आणि त्या आधारे ही निवड झाली. मी दिलेले पैसे मंदिराच्या कामासाठी वापरले जातील जे धार्मिक कार्य आहे. कोणत्याही प्रकारची दारू व इतर कामात पैशाची उधळपट्टी टाळली जाईल.' हेही वाचा-  दिव्यांग महिलेच्या पाया पडतानाचा PM Modi चा 'हा' फोटो Viral, वाचा काय आहे त्यामागचं कारण
   निवडणुकांमुळे गावात वाद निर्माण होऊ नये, गावात गटबाजी वाढू नये, गावाचा विकास व्हावा, यासाठी अनेकदा गावातील ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये काहीवेळा यशदेखील येतं. पण सरपंचपदाचा लिलाव करून ती रक्कम गावच्या विकासासाठी वापरण्याचा मध्य प्रदेशातील एका गावातील ग्रामस्थांनी काढलेला फंडा चांगलाच चर्चेत आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Madhya pradesh

  पुढील बातम्या