Home /News /national /

बहिणीच्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करत न्यायालयाने घेतला हा निर्णय

बहिणीच्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करत न्यायालयाने घेतला हा निर्णय

ही घटना 2014 ची आहे. सुप्रीम कोर्टानं आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे की, हा गुन्हा ज्या पद्धतीनं केला गेला तो भयानक आणि भीषण होता.

    नवी दिल्ली, 14 मे: सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) एका प्रकरणात आपला निर्णय बदलला आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) आपल्या चुलत बहिणीच्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या एका आरोपीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. ही घटना 2014 ची आहे. सुप्रीम कोर्टानं आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे की, हा गुन्हा ज्या पद्धतीनं केला गेला तो भयानक आणि भीषण होता.पण ते 'रेरेस्ट ऑफ रेअर केसेस' या श्रेणीत येत नाही. न्यायमूर्ती एएम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आणि सांगितले की, 30 वर्षे तुरुंगात घालवण्यापूर्वी त्याला कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सांगितलं की, या प्रकरणात एक अल्पवयीन 8 वर्षांची मुलगी, जी दुसरी तिसरी नसून आरोपीच्या चुलत बहिणीची मुलगी होती. बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. रेकॉर्डवरील पुराव्यावरून ही घटना अत्यंत क्रूर असल्याचं दिसून येतं. स्वामी श्रध्दानंदच्या बाबतीत निवाड्यात अवलंबलेली प्रक्रिया आणि श्रीहरनच्या बाबतीत पुनरावृत्ती झालेली पद्धत या प्रकरणात पाळली जावी असं आमचं मत आहे. दुसऱ्या शब्दात, फाशीच्या शिक्षेत बदल करूनही अपीलकर्त्याला मुदतपूर्व सुटका/माफीच्या तरतुदींचा वापर न करता पुरेशा कालावधीसाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात यावी. सुप्रीम कोर्टानं आपल्या टिप्पणीत काय म्हटलं? अशा प्रकारे सुप्रीम कोर्टानं दोषीला आयपीसी कलम 302 अंतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुप्रीम कोर्टानं दोषीला 30 (तीस) वर्षांच्या कालावधीसाठी वास्तविक कारावासाची शिक्षा सुनावली आणि त्यापूर्वी सुटका/माफीच्या तरतुदी लागू होणार नाहीत असं सांगितलं. कोर्टानं निरीक्षण केलं की दोषीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता आणि तो गरीब सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीचा होता हे सत्य आहे. शिक्षा सुनावताना तुरुंगातील त्याचे निर्दोष वर्तनही विचारात घेतले गेले. Delhi Mundka Fire: 'त्या' एका WhatsApp मेसेजनं वाचवले 100 लोकांचे प्राण,नाहीतर... सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, गुन्हा करताना दोषीचं वय 25 वर्षे होतं ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वरील बाबी लक्षात घेऊन अपीलकर्त्याच्या सुधारणेची आणि पुनर्वसनाची शक्यता नाकारण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. या चर्चेचा लांबलचक आणि छोटासा मुद्दा असा आहे की, सध्याच्या खटल्याला 'रेरेस्ट ऑफ रेअर केसेस' या श्रेणीत ठेवता येणार नाही, ज्यामध्ये फाशीची शिक्षा देण्याशिवाय पर्याय नाही. या खटल्यात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime, Madhya pradesh, Murder, Rape, Supreme court

    पुढील बातम्या