Home /News /national /

रुग्णालयाच्या एका चुकीमुळं आईनं गमावलं आपलं मुलं, कुशीतच होतं लेकरू पण...

रुग्णालयाच्या एका चुकीमुळं आईनं गमावलं आपलं मुलं, कुशीतच होतं लेकरू पण...

मध्य प्रदेशातील कटनी इथं एका आईनं आपल्या कुशीतच 5 वर्षांच्या लेकाला गमावलं. याचं कारण ठरलं एक इंजेक्शन.

    कटनी, 08 जून : एकीकडे देश कोरोनासारख्या अदृश्य रोगाशी दोनहात करत असताना लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. यातच मध्य प्रदेशातील एका कुटुंबावर लॉकडाऊनमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मध्य प्रदेशातील कटनी इथं एका आईनं आपल्या कुशीतच 5 वर्षांच्या लेकाला गमावलं. याचं कारण ठरलं एक इंजेक्शन. पाच वर्षांच्या या मुलाला रेबीजचं इंजेक्शन वेळेवर न मिळाल्यामुळं त्याचा जीव गेला. पाच महिन्यांपूर्वी या मुलाला कुत्रा चावला होता. त्यासाठी रेबीजचं इंजेक्शन घेणे गरजेचे असते. येथील सरकारी रुग्णालयात या मुलाला पहिला डोस देण्यात आला मात्र दुसरा डोस देण्यासाठी त्याला तब्बल 4 दिवस वाट पाहावी लागली, त्यानंतर डॉक्टरांनी इंजेक्शन उपलब्ध नसल्याची सबब पुढे केली. लॉकडाऊनमुळं मुलाला खाजगी रुग्णालयात घेऊन जाणं शक्य नव्हत आणि या कुटुंबाला परवडणारही नव्हतं. मृत बाळाचे वडील एक रिक्षाचालक असून, लॉकडाऊनमध्ये रिक्षाही बंद होत्या, त्यामुळं पैशांअभावी त्यांनी मुलावर सरकारी रुग्णालयात उपाचर करण्याचा निर्णय घेतला. वाचा-एकाच वडिलांवर लेकानं दोनवेळा केले अंत्यसंस्कार, असा झाला गोंधळ दरम्यान, या मुलाला 3 दिवसांपूर्वी रुग्णलयात घेण्यात जाण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी उपचारास नकार दिला. त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मात्र तिथं गेल्यानंतर मुलावर उपचार करण्यासाठी डॉक्टर हजर नव्हते. अखेर वडीलांनी डॉक्टरांच्या पाया पडल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले, मात्र काही तासांतच त्याला डिस्चार्ज देण्यात आला. वाचा-मोठ्या बहिणीसोबत कपडे धुण्यासाठी लहान भावडं गेली, ती परतलीच नाही! या मुलाला घरी घेऊन जात असताना वाटतेच या मुलानं प्राण सोडले. आपल्या कुशीतच लेकाचा झालेला मृत्यू या आईला बघवला, नाही आणि याचा तिला जबर धक्का बसला. या प्रकरणानं सर्वांनाच धक्का बसला, दरम्यान याची चौकशी केल्यानंतर जिल्ह्यात गेले 4 महिने रेबीजचे इंजेक्शन नसल्याचं समोर आले. मात्र गरिबी आणि रुग्णालयाच्या अपुऱ्या सुविधेमुळं एका आईला आपलं मुल गमवावं लागलं. वाचा-गंगेत वाहून जात होती आई, 16 वर्षीय लेकीनं नदीत उडी मारली आणि...
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या