Home /News /national /

अखेरचा प्रयत्नही अपुरा पडला, 91 तासांनंतर बोरवेलमधू 3 वर्षांच्या चिमुकल्याचा बाहेर काढला मृतदेह

अखेरचा प्रयत्नही अपुरा पडला, 91 तासांनंतर बोरवेलमधू 3 वर्षांच्या चिमुकल्याचा बाहेर काढला मृतदेह

4 दिवसांपूर्वी बोअरवेलमध्ये पडलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न करण्यात आले मात्र मुलाची झुंज अपयशी ठरली अन् प्रयत्नही तोकडे पडले.

    निवाडी, 08 नोव्हेंबर : 4 दिवसांपूर्वी बोअरवेलमध्ये पडलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न करण्यात आले. चिमुकल्याला सुखरुप बाहेर यावा यासाठी सुरुंग लावून खड्डा तयार करण्यात आला मात्र प्रशासनाला हाती अपयशच आलं. चार दिवसांनंतर तब्बल 91 तासांनी या चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. हृदय पिळवटून टाकणारी घटना मध्य प्रदेशातील सैतपुरा बारह गावात घडली आहे. 4 नोव्हेंबरला 3 वर्षांची चिमुकल्याला बोअरवेलमध्ये पडला होता. बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न शेवटी अपयशी ठरला. रविवारी सकाळी 3 वाजण्याच्या सुमारास प्रह्लाद कुशवाहाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि गावावर शोककळा पसरली आहे. सेतपुरबार गावात प्रल्हादा कुशवाह नावाच्या एका 3 वर्षाच्या मुलाला आपल्या शेतात खेळत होता. त्यावेळी बोअरवेलच्या वर असलेलं झाकणं काढून ठेवण्यात आलं होतं. 3 वर्षांचा प्रल्हाद खेळता खेळता या बोअरवेलमध्ये पडला. थोड्यावेळानं जेव्हा तो नाहीसा झाला तेव्हा त्याला शोधण्याची धडपड सुरू झाली. बोअरवेलच्या आतून रडण्याचा आवाज येऊ लागला आणि ताततडीनं प्रशासनाला कळवण्यात आलं. हे वाचा-SBI Alert! ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, आज मिळणार नाहीत बँकेच्या या सेवा या बोअरवेलचं काम 5 दिवसांपूर्वीच करण्यात आलं होतं. मात्र वर पॅन बसवण्याचं काम सुरू असताना अचानक प्रल्हाद तिथपर्यंत पोहोचला. मुलाला वाचवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनानं अहोरात्र प्रयत्न केले. सुरुंग लावून मोठा खड्डा देखील तयार करण्यात आला मात्र चिमुकल्याची झुंज अपयशी आणि प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडले. 91 तासांनंतर प्रल्हादला बोअरवेलच्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या