भोपाळ, 27 सप्टेंबर: लूडो हा बैठी खेळ तर सर्वांनाच माहीत आहे. खेळात तर हार जीत होत राहाते पण चक्क एका तरुणीनं हरल्यानंतर थेट आपल्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांसोबत लूड खेळत असताना तरुणाला वडिलांनी हरवलं या रागातून तिने थेट तक्रार दाखल केली आणि फॅमेली कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलं.
दरम्यान या तरुणीनं वडिलांनी आपल्याला लूडो खेळात हरवल्याचं सहन झालं नाही म्हणून तक्रर दाखल केली आहे. एका 24 वर्षीय महिलेने वडिलांविरोधात भोपाळ कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. लुडोच्या गेममध्ये तिच्या वडिलांनी तिची फसवणूक केल्याचा आरोप या महिलेनं केला.
The woman said she lost respect for her father as he went on to defeat her. She feels that her father should have lost in the game for the sake of her happiness. After 4 counselling sessions, she now feels positive: Sarita, a counsellor at Bhopal Family Court https://t.co/P9Lbl6iKJB
या प्रकरणात कोर्टाच्या सल्लागार सरिता म्हणाल्या, या महिलेनं तिच्या वडिलांवर विश्वास ठेवला आणि खेळ सुरू केला. वडील आपली फसवणूक करतील याची जराही अपेक्षा नव्हती. ते मुलीसाठी हरू देखील शकत होते मात्र त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात या तरुणीनं धाव घेतली. या संपूर्ण प्रकार समजून घेऊन या तरुणीची 4 समुपदेश सत्र देखील घेण्यात आली आहेत.
समुपदेशन करणाऱ्या सरिता यांनी सांगितले की या महिलेनं वडिलांप्रती असलेला सन्मान हरल्यामुळे गमवला आहे. माझ्या सुखासाठी आणि आनंदासाठी वडिलांनी हरून मला जिंकवणं गरजेचं होतं मात्र त्यांनी तसं केलं नाही त्यामुळे मुलीनं तक्रार दाखल केल्याचं सांगितलं. आता समुपदेशनाची 4 सत्र झाल्यानंतर या मुलीमध्ये बदल घडत असल्याची माहिती सरिता यांनी दिली.