भोपाळ, 16 डिसेंबर : देशभरात अजूनही कोरोनाचं सावट म्हणावं तेवढं कमी झालेलं नाही. दिवसाला 22 ते 25 हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांचं मनोबल वाढवण्यासाठी संगीत, डान्स अथवा खेळ खेळले जात असल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले होते मात्र या सगळ्यात चर्चा आहे ती या 2 वर्षांच्या चिमुकल्याची.
कोव्हिडी सेंटरमध्ये 2 वर्षांच्या चिमुकल्यानं बल्ले बल्ले करत डान्स केला आहे. आपल्यासोबत या सेंटरमधील सर्वांना डान्स करण्यासाठी प्रत्साहित देखील केलं. सर्वजण या चिमुकल्याभोवती गोल करून डान्स करत आहेत. हा चिमुकल्या भांगडा डान्स करताना दिसत आहे. या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोव्हिड सेंटरमध्ये या चिमुकल्यानं सर्वांमध्ये एक उत्साह आणि ऊर्जा निर्माण केली.
घरापासून दूर असलेल्या 2 वर्षांच्या चिमुकल्यानं COVID-19 सेंटरमध्ये केला भन्नाट भांगडा डान्स, पाहा VIDEO pic.twitter.com/sLUcD30z01
मध्य प्रदेशातील भोपाळ इथल्या कोव्हिड सेंटरमधील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना वॉर्डमध्ये या चिमुकल्यासह सर्वांनी भांगडा डान्स करून आनंद घेतला. तर चिमुकल्यानं वृद्धांना देखील भांगडा करण्यासाठी हट्ट धरला. त्यामुळे कोव्हिड सेंटरमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळाला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या आधी देखील कोरोना सेंटरमध्ये किंवा वॉर्डमध्ये अनेकदा खेळ खेळल्याचे, गाणी म्हटल्या अगदी दिवाळीत गरबा खेळल्याचे देखील व्हिडीओ समोर आले होते. कोरोना काळात रुग्ण आपल्या घरापासून खूप लांब असतात त्यांना एकटं वाटू नये आणि सतत सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह मिळावा आणि कोरोनातून लवकर बरे व्हावेत यासाठी सतत्यानं आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स आणि नर्स प्रयत्न करत असतात. या चिमुकल्यानं सर्वांची मरगळ दूर कर भांगडा करायला लावल्यानं कोव्हिड वॉर्डमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.