ग्वालियर, 20 जून: स्टेट बँक ऑफ इंडियामधील एका शाखेतील गोल्ड लोन लॉकरमधून तब्बल 15 किलो सोन्याची चोरी झाल्याचं प्रकरण समोर आली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत बँकेतील कॅशियर आणि त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शियोपूरच्या SBI शाखेच्या व्यवस्थापकाने लॉकरमधून 15 किलो सोनं चोरी झाल्याची 10 जून रोजी तक्रार दाखल केली. बँकेत चोरी झाल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीनं कारवाई करून प्रकणाचा छडा लावला.
पोलीस तपासात बँकेच्या कॅशियरवर पोलिसांना संशय आला. अधिक तपास केल्यानंतर कॅशियर राजीव याने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून ही चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसात छोटे छोटे दुवे जोडल्यानंतर कॅशियरसह त्याचे मित्र आणि प्रेयसीला ताब्यात घेण्यात आले. यासाठी त्यांनी 26 वेळा बनावट कर्ज घेतल्याचं समोर आलं.
या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून 3 लाख रुपये सोनं आणि 11 लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही चोरी गोल्ड लोनमधून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
हे वाचा-
शेतकरी वडिलांनी घेऊन दिला नाही टॅब, नाराज विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल
हे वाचा-
प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावानं आधी बहिणीच्या पतीवर केले सपासप वार मग...
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.