10 वर्षांच्या मुलानं केली बँकेत चोरी, अवघ्या 30 सेकंदात उडवले 10 लाख

10 वर्षांच्या मुलानं केली बँकेत चोरी, अवघ्या 30 सेकंदात उडवले 10 लाख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाला 20 वर्षांचा एक तरुण गाइड करत होता.

  • Share this:

नीमच, 17 जुलै: 10 वर्षांच्या मुलानं सहकारी बँक लुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बँकेत एवढी मोठी चोरी झाल्याची साधी चाहूलही बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नव्हती. ही घटना बँकेच्या कामकाजादरम्यान घडली आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे हा भयंकर प्रकार उघड झाला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील नीमच इथे घडला आहे.

मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार सीसीटीव्ही फुटेजमुळे एवढी मोठी चोरी झाल्याचं उघड झालं आहे. सकाळी अकरा वाजता मुलाने सहकारी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर तो कॅशियर जिथे बसतो तिथे गेला. त्यानं हळूच कोणाचं लक्ष नाही हे पाहून डेस्क खाली लपण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानं हळूहळू कॅशियर जवळ असलेली कॅश चोरी करून बँगेत टाकली आणि बाहेर आला. हा संपूर्ण प्रकार केवळ 30 सेकंदात घडल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचा-एका फोटोसाठी बापानं लेकाला खोल दरीमध्ये लटकवलं! धक्कादायक VIDEO VIRAL

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाला 20 वर्षांचा एक तरुण गाइड करत होता. हा मुलागा बँकेतून बाहेर पडला तेव्हा त्याची एक तरुण वाट पाहात असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या घटनेदरम्यान, बँकेतले बरेच ग्राहक काउंटरजवळ उभे राहिले आहेत. यावेळी हा मुलगा टेबलाखालून बसतो आणि नंतर टेबलावर आरामात ठेवलेली रोकड चोरतो. सीसीटीव्हीमध्ये हे मुल बॅगमध्ये पैसे ठेवताना दिसत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 17, 2020, 11:24 AM IST

ताज्या बातम्या