भोपाळ 7 डिसेंबर : मध्यप्रदेशातल्या एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत मध्यप्रदेशात भाजपला धोक्याची घंटा असून काँग्रेस आणि भाजपमधल्या जागांमध्ये फारसा फरक दाखवण्यात आलेला नाही. काँग्रेसने बढत घेत भाजपच्या बरोबरीने स्थान मिळवलं आहे. तर भाजपच्या जागा घटतील असा अंदाज आहे. विविध एक्झिट पोलमध्ये दाखवलेल्या दोन्ही पक्षांच्या जागांध्ये फारसा फरक नाही.राज्यात निसटतं बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशात एकूण 231 जागा असून बहुमतासाठी 116 जागांची आवश्यकता आहे.
रिपब्लिक
मध्य प्रदेश
भाजप- 90-106 जागा
कांग्रेस- 110-126 जागा
न्यूज़ एक्स
भाजप - 106 जागा
कांग्रेस- 112 जागा
टाइम्स नाउ
भाजप - 126 जागा
कांग्रेस- 89 जागा
इंडिया टुडे
भाजप - 102-120 जागा
कांग्रेस- 104-122 जागा
मध्यप्रदेशात काँग्रेस 15 वर्षानंतर सत्ता मिळविण्याचा जोरदार प्रयत्न करतेय. तर 15 वर्षांची सत्ता टिकवण्यासाठी भाजपची धडपड आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आपली पूर्ण ताकद यावेळी प्रचारात लावली होती. मात्र सलग तीन वळा निवडून आल्यामुळं सकारच्या विरोधात लोकांच्या असलेल्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागतोय.
त्याच बरोबर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेही त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र शिवराज सिंग यांची व्यक्तिगत प्रतिमा लोकांमध्ये चांगली आहे ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
तर काँग्रेसने यावेळी ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना बाजूला ठेवून सर्व सूत्र माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि तरूण नेते आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हातात दिली होती.
तिकिट देतानाही काँग्रेसने अनेक नव्या नेत्यांना संधी दिल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशात पहिल्यांदाच 75 टक्के मतदान झालं होतं. या अधिक मतदानाचा फायदा कुणाल होतो हे लवकरच कळणार आहे. 28 नोव्हेंबरला 65 हजार 367 मतदान केंद्रावर मतदान झालं होतं.
VIDEO: कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी भोवळ येऊन कोसळले
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा