कोळसा घोटाळा प्रकरणी मधु कोडा, एच सी गुप्ता दोषी

कोळसा घोटाळा प्रकरणी मधु कोडा, एच सी गुप्ता दोषी

दिल्ली विशेष न्यायालयात याप्रकरणी सुनावणी चालू असून उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. गेले काही वर्ष कोळसा घोटाळा प्रकरण प्रचंड गाजले होते.

  • Share this:

13 डिसेंबर: कोळसा घोटाळा प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा आणि कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना दोषी करार देण्यात आला आहे.

दिल्ली विशेष न्यायालयात याप्रकरणी सुनावणी चालू असून उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. गेले काही वर्ष कोळसा घोटाळा प्रकरण प्रचंड गाजले होते. कोळश्याच्या खाणींच्या वाटपासंदर्भात हा घोटाळा करण्यात आला होता. याप्रकरणात

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही समन्स पाठवण्यात आली होती. तसंच अनेक इतर दिग्गजांवरही यात आरोप झाले होते. यातील झारखंडच्या खाणी वाटपासंदर्भातील दोषी करार आज देण्यात आला आहे.

याप्रकरणी आता दिल्ली विशेष न्यायालय काय शिक्षा देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 11:35 AM IST

ताज्या बातम्या