'मॅडम प्लीज माझं लग्न लावून द्या' 2 फूट उंचीच्या तरुणाने महिला पोलिसांसमोर मांडली व्यथा

'मॅडम प्लीज माझं लग्न लावून द्या' 2 फूट उंचीच्या तरुणाने महिला पोलिसांसमोर मांडली व्यथा

2 Feet Man Marriage : वयाची 26 वर्षे उलटून गेले, तरीही लग्नासाठी नवरी मिळत नाहीये, त्यामुळे वैतागलेल्या युवकानं थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे. 2 फूट उंची असल्यानं लग्नात येणाऱ्या अडचणींची व्यथा तरुणाने पोलीस ठाण्यात मांडली आहे.

  • Share this:

शामली, 12 मार्च: लग्न जमत नसल्यानं एका 26 वर्षीय व्यक्तीला प्रचंड नैराश्य आलं आहे. या व्यक्तीची 2 फुटांची उंची (2 feet Man) त्यांच्या लग्नातील मुख्य समस्या बनली आहे. वयाची 26 वर्षे उलटून गेले, तरीही लग्नासाठी नवरी (Not getting bride for Marriage) मिळत नाहीये, त्यामुळे वैतागलेल्या युवकानं थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे. त्याने याठिकाणी 'मॅडम प्लिज माझं लग्न करून द्या, अजून किती दिवस मी एकटा राहू, अशा शब्दांत महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे याचना केली आहे. यामुळे विचित्र घटनेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

यावेळी संबंधित तरुणाने पोलीस स्थानकात जावून महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबर आपल्या आयुष्याची व्यथा मांडली आहे. वयाची 26 वर्षे उलटून गेली तरीही आपलं लग्न होतं नाहीये. आपली उंची दोन फुट असल्याने नवरी मिळत नाहीये. तर एखादी नवरी मिळालीच तर घरचे लग्न लावून देत नाहीत, अशा शब्दांत त्याने आपली व्यथा मांडली आहे. पण याप्रकरणी पोलिसही त्याची काहीच मदत करू शकले नाहीत. त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनमधूनही मोकळ्या हातानेच परतावं लागलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित 26 वर्षीय युवकाचं नाव मोहम्मद अझीम असून तो शामलीच्या जनपद परिसरात राहतो. त्याची उंची 2 फुट आहे, त्यामुळे त्याला लग्नासाठी नवरी मिळत नाहीये. गेल्या काही वर्षांपासून त्याला त्याच्या लग्नाची चिंता सतावत आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने अनेक प्रयत्न करूनही त्याला नवरी मिळायला अडचणी येत आहे. आपल्याला नवरी मिळावी यासाठी त्याने अनेकांना बोलून ठेवलं आहे, पण याचा काही उपयोग होतं नाही. त्यामुळे त्याने शेवटचा मार्ग म्हणून पोलीस स्टेशन गाठलं आहे. पण येथेही त्याच्या हाती निराशाचं आली आहे. यावेळी पोलिसही त्याला मदत करू शकले नाहीत.

हे ही वाचा -बॉयफ्रेंडने नकार दिल्यावर 136 किलो वजन असलेल्या महिलेनं केलं असं की...

याआधीही हा तरूण अनेक अधिकाऱ्यांच्या पत्रांसोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पुन्हा एकदा तो लग्नाच्या मागणीमुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'मी लग्न लावून देण्याची मागणी घेऊन महिला पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. पण माझी मागणी पूर्ण झाली नाही.' लग्नासाठी पोलिसांत साकडं घातल्यानंतर संबंधित तरुण सोशल मीडियात चांगलाचं व्हायरल होतं आहे.

Published by: News18 Desk
First published: March 12, 2021, 9:10 PM IST

ताज्या बातम्या