मदर्स डे निमित्त सुदर्शन पटनाईकांचे विशेष शिल्प ; मोदींच्या आईला केलं अभिवादन

मदर्स डे निमित्त सुदर्शन पटनाईकांचे विशेष शिल्प ; मोदींच्या आईला केलं अभिवादन

या शिल्पाचं नाव माँ की ममता आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली आई हिराबैन मोदी यांच्याकडून आशिर्वाद घेत आहेत असं चित्तारण्यात आलंय. हे चित्र त्यांनी पुरीच्या बिचवर काढलंय. काही दिवसांपूर्वी फेसबुक कंपनीला भेट दिली असता मोदींनी आपल्या आईचा उल्लेख केला होता

  • Share this:

 13 मे: आज जगभरात मदर्स डे साजरा होतोय. या दिवसानिमित्त जगभर वेगवेगळे उपक्रम केले जात आहे.  यात  भारतात लक्षणीय  ठरलं ते म्हणजे वाळू शिल्पकार  सुदर्शन पटनाईकांचं वाळू शिल्प. या वाळू शिल्पातून त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आईला अभिवादन केलंय.

या शिल्पाचं नाव माँ की ममता आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली आई हिराबैन मोदी यांच्याकडून आशिर्वाद घेत आहेत असं चित्तारण्यात आलंय. हे चित्र त्यांनी पुरीच्या  बिचवर काढलंय. काही दिवसांपूर्वी फेसबुक कंपनीला भेट दिली असता मोदींनी आपल्या आईचा उल्लेख केला होता. आपल्या अनेक भाषणांमध्ये मोदींनी त्यांच्या आईचा उल्लेख केला आहे. हिराबैन या नव्वदी पार असून अजून अत्यंत साधं जीवन त्या जगतात.

याशिवाय रवी शंकर प्रसाद ,स्मृती इराणी सह अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या आईसह  फोटो ट्विट केले आहेत . जगभरात

अमेरिकेमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस हा साजरा केला जात होता तो नंतर अनेक देशांनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली. प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी घेतलेले कष्ट, त्यांच्यासाठीचा त्याग, असीम प्रेम या सगळ्याची दखल घेत आईचे आभार मानण्यासाठीचा हा दिवस...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2018 11:32 AM IST

ताज्या बातम्या