मराठी बातम्या /बातम्या /देश /रातोरात प्रसिद्ध झाली कोलकात्याची 'MA English Chaiwali', टपरीवर चहाचीच नाही तर लग्नासाठीही होतेय मागणी

रातोरात प्रसिद्ध झाली कोलकात्याची 'MA English Chaiwali', टपरीवर चहाचीच नाही तर लग्नासाठीही होतेय मागणी

MA English Chaiwali : चहाविक्री करण्याबरोबर टुकटुकी तिचं स्वतःचं युट्यूब चॅनलदेखील चालवते. त्यावरचे तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत

MA English Chaiwali : चहाविक्री करण्याबरोबर टुकटुकी तिचं स्वतःचं युट्यूब चॅनलदेखील चालवते. त्यावरचे तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत

MA English Chaiwali : चहाविक्री करण्याबरोबर टुकटुकी तिचं स्वतःचं युट्यूब चॅनलदेखील चालवते. त्यावरचे तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : स्वत:च्या घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून प्रामाणिकपणे कष्ट केल्यास त्याचं नक्की फळ मिळतं, ही गोष्ट कोलकात्यातल्या एका तरुणीनं सिद्ध करून दाखवली आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर लोकांच्या नजरेत कमी दर्जाचं असलेलं कामदेखील तुम्हाला पैसा (Money) आणि प्रसिद्धी (Fame) मिळवून देतं, याची प्रचिती या मुलीला आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मुलीची गोष्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या जिद्दीचं कौतुकदेखील केलं आहे. टुकटुकी दास (Tuktuki Das) असं या मुलीचं नाव असून, ती पश्चिम बंगालमधल्या कोलकाता शहरात राहते.

    अनेक प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्यानं टुकटुकीनं चहा (Tea) विकण्यास सुरुवात केली आहे. सध्या 'एमए इंग्लिश चायवाली' (MA English Chaiwali) या नावानं तिला सर्व जण ओळखतात.

    प्रत्येक मुला-मुलीच्या आई-वडिलांप्रमाणे टुकटुकीच्या आई-वडिलांनीदेखील शिक्षणाचं महत्त्व तिला समजून सांगितलं होतं. शिक्षण मिळवलं तर ती यशाचं शिखर गाठू शकते, अशी शिकवण त्यांनी आपल्या मुलीला दिली होती. आपल्या मुलीनं मोठं होऊन शिक्षिका व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. टुकटुकीनंही मोठ्या कष्टानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. दिवस-रात्र अभ्यास करून एम इंग्लिश पदवी मिळवली. नोकरीसाठी तिनं अनेक परीक्षा दिल्या, तरीदेखील तिला नोकरी मिळाली नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्या गरीब आई-वडिलांना मदत करण्यासाठी तिनं चहा विकण्याचा निर्णय घेतला. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या हाबरा स्टेशनवर (Habra station) टुकटुकीनं चहाची टपरी सुरू केली आहे. टपरीचा बोर्ड वाचून अनेकांना तिच्याबद्दल कुतुहल निर्माण होतं. 'एमए इंग्लिश चायवाली' असं तिनं आपल्या चहा टपरीचं नाव ठेवलं आहे. या नावामुळे गेल्या काही दिवसांपासून टुकटुकी इंटरनेटवर प्रसिद्ध झाली आहे.

    वाचा : पैशांपुढे मैत्री हरली! रिक्षातून 50 लाखांचे दागिने घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याचा मित्राने केला घात, पण...

    टुकटुकीचे वडील एक व्हॅन ड्रायव्हर आहेत, तर आई एक छोटं किराणा दुकान चालवते. आपल्या सुशिक्षित मुलीनं चहा विकावा, या गोष्टीला सुरुवातीला त्यांचा विरोध होता; मात्र आता तिला मिळत असलेल्या यशामुळे ते समाधानी आहेत. 'चहाविक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय टुकटुकीनं आम्हाला पहिल्यांदा सांगितला, तेव्हा आम्ही नाराज झालो. आमच्या मुलीनं शिक्षिका व्हावं, अशी आमची इच्छा होती; मात्र तिनं चहा विकून आत्मनिर्भर होण्याचा निर्धार केला होता. सांगोपांग विचार केल्यानंतर आम्हीदेखील तिला परवानगी दिली,' असं टुकटुकीचे वडील प्रशांतो दास म्हणाले.

    काही महिन्यांपूर्वी टुकटुकीनं इंटरनेटवर 'एमबीए चायवाला' नावानं प्रसिद्ध असलेल्या मुलाची गोष्ट पाहिली होती. त्यातूनच तिला चहा विकण्याची प्रेरणा मिळाली. 'कुठलंही काम कमी दर्जाचं नसतं, असा विचार करून मी चहाचं दुकान टाकण्याची तयारी केली. सुरुवातीला जागा मिळण्यास अडचणी आल्या; मात्र खूप शोधल्यानंतर तो प्रश्नही सुटला. आता मी रेल्वे स्टेशनवर चहा-नाश्ता विकण्याचं काम करते. माझ्याकडे एमएची डिग्री आहे, म्हणून मी माझ्या दुकानाचं नाव 'एमए इंग्लिश चायवाली' ठेवलं,' अशी माहिती टुकटुकीनं दिली.

    वाचा : उद्योगपतीच्या मुलाचं शाही लग्न; पत्रिकेचं वजनच फक्त 4 किलो 280 ग्रॅम! पाहा PHOTOS

    चहाविक्री करण्याबरोबर टुकटुकी तिचं स्वतःचं युट्यूब चॅनलदेखील चालवते. त्यावरचे तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक जण तिच्या दुकानाला भेट देतात. 'मला भेटायला येणारे लोक प्रोत्साहन देतात, काहींनी तर माझ्या घरी लग्नासाठी स्थळंदेखील पाठवली आहेत. सुरुवातीला माझ्या आईवडिलांना वाटायचं मी चहा विकला तर माझ्याशी लग्न कोण करणार? मात्र आता मुलांची लाइन लागली आहे,' असं टुकटुकी सांगतं.

    व्यवसाय (Business) सुरू करण्यासाठी कौशल्य आणि मनाची तयारी लागते. तुमचं शिक्षण, तुम्ही मुलगा आहात की मुलगी, गरीब आहात की श्रीमंत या गोष्टी आडव्या येत नाहीत, हे टुकटुकी दास नावाच्या या मुलीनं सिद्ध करून दाखवलं आहे. ती आता अनेक मुलींसाठी प्रेरणा बनली आहे.

    First published:
    top videos