कानपूर, 3 जुलै : हुंड्यात लक्झरी कार आणि रोकड दिली नसल्यामुळे एका व्यक्तीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर पती वारंवार बायकोला हुंड्यासाठी मारहाण करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
हुंडा का दिला नाही, असे म्हणतं तो अनेकदा पत्नीला मारहाण करीत होता. अनेकदा घटस्फोट व दुसऱ्या लग्नाची धमकी दिल्याची माहिती पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मारहाणीने कंटाळलेली पीडिता आपल्या घरी निघून गेली. तर पत्नीच्या घराच्या उंबरठ्यावर जाऊन त्याने तिने तिहेरी तलाक दिला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दारात उभे राहून घटस्फोट-घटस्फोट-घटस्फोट म्हणाला
चमनगंज परिसरातील मोहम्मद अली पार्क येथे राहणाऱ्या रुखसार फातिमा हिला तिच्या पत्नी लक्झरी कार व 5 लाख रुपये रोख न दिल्याने तिहेरी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. ज्यानंतर ती शॉकमध्ये आहे. रुखसारच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरला तिच्या कुटुंबीयांनी मोहम्मद आसिफसोबत लग्न लावून दिले होते. वडिलांकडून शक्य तितका हुंडा दिला. पण लग्नाच्या काही दिवसानंतर पती हुंड्यासाठी मारहाण करु लागल्याचे पीडित महिलेने सांगितले.
हे वाचा-मंदिरात जाण्यासाठी हवा होता पास, मोदी म्हणाले..आणि काम झालंच
तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना बर्याच वेळा याबाबत सांगितले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, 25 मार्च रोजी तिचा नवरा आसिफने पाच लाख रोख रकमेची मागणी केली आणि त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे हवे होते. शिवाय त्याने लक्झरी कारचीही मागणी केली. रुखसारने आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे पैसे मागण्यास नकार दिला असता आसिफने तिला मारहाण केली. त्यानंतर पीडित महिला घरी निघून गेली त्यानंतर 27 जून रोजी तो पीडित महिलेच्या माहेरी येऊन दारात तिहेरी तलाक दिल्याची माहिती समोर आली आहे